प्रासंगिक - चंद्रयान-२ आणि नेतृत्व
प्रासंगिक - इस्रो आणि नेतृत्व चंद्रयान-२ ही भारताची महत्वाकांक्षी मोहीम अपेक्षित संपूर्ण यश प्राप्त करू शकली नाही हे जरी वास्तव असलं तरी तज्ञांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यावर भारताची ही मोहिम सपशेल अपयशी झाली असे म्हणता येणार नाही. या मोहिमे अंतर्गत पाठवण्यात आलेल्या यानाचे ऑर्बिटर, लँडर (विक्रम) आणि रोव्हर(प्रज्ञान) असे प्रमुख तीन भाग होते. अखेरच्या टप्प्यात लँडर विक्रमचा संपर्क, शेवटचे काही क्षण राहिले असताना तुटला आणि अपेक्षित चंद्रावतरण साध्य झाले नाही. मात्र त्या नंतरही अद्याप ऑर्बिटर संपर्कात असल्याने अलगद चंद्रावतरण (सॉफ्ट लँडिंग) होऊ शकलं नसल तरी मोहिमेची अन्य बरीच उद्दिष्टे पूर्ण होणार आहेत. समाजाच्या विभिन्न स्तरातून, माध्यमातून पुर्णतः नकारात्मक सूर उमटलेला नाही. देशवासियांनी, देशाच्या नेतृत्वाने इस्रोच्या पाठीशी भक्कम पणे उभं राहण्याची भूमिका घेतली आणि हर न मानत नव्यानं प्रयत्न सुरू ठेवून चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचं स्वप्न पूर्णत्वास नेलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने(ISRO) यापूर्वीही काही अपयशी प्रसंग अनुभवले आहेत आणि हताश न होता पुढच्या प्रयत्नात यश खेचून आणले आहे. माजी...