पोस्ट्स

जुलै, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून - 'कर्मयोग'

इमेज
‘सुगमगीत सांगे गीतसार’ (Note - Image courtesy : Google) कित्येकदा आपल्यापैकी अनेक जण एखादा विषय गहन आहे, क्लिष्ट आहे, समजुतीच्या बाहेर आहे असे काही समज (stereos) आपल्या मनात बाळगून असतात. मनाच्या असल्या धारणेमुळे, एखादा प्रांत हा आपला नाही असा निष्कर्षही काढतात. पण दुर्बोधता ही मुळी नेहमी विषयातच असते असं नाही तर बरेचदा ती समजावून सांगणाऱ्यांच्या मांडणीत असते असं मला कित्येकदा वाटतं. काही जणांना दुर्बोध, कठीण असा विषयही सुबोध, सरल आणि सुगम रीतीनं मांडण्याचं कसब साध्य झालेलं असतं.  भारतीय तत्त्वज्ञान विषयक ग्रंथ, भगवद्‌गीतेचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एखादा व्यासंगी ज्ञानार्जनासाठी मूळ ग्रंथ वाचेल, त्यावरील टीका वाचेल पण सरसकट सामान्य माणसाला "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन","नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः","वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि" या श्लोकांची तोंडओळख भलेही असेल पण अठरा अध्याय, सातशे श्लोक असा समग्र व्यासंग करणारी मंडळी संख्येनं निश्चितच मर्यादित असणार. अशा लोकांपर्यंत गीतेचं तत्वज्ञान पोहोचवायचं असेल त...