पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतिबनातून – चहा की कॉफी(पद्य)

इमेज
चहा की कॉफी चहा म्हणजे मैत्री कॉफी म्हणजे प्रेम चहा मरगळ आल्यावर कॉफी आठवणीत रमल्यावर चहा म्हणजे कथासंग्रह..., कॉफी म्हणजे कादंबरी...! चहा रात्रंदिन त्रिकाळ  कॉफी धुंद संध्याकाळ चहा चिंब भिजल्यावर..., कॉफी ढग दाटुन आल्यावर...! चहा गप्पा मारत कॉफी गुजगोष्टी करत चहा म्हणजे उस्फूर्तता..., कॉफी म्हणजे उत्कटता...!! चहा उमेदवारीच्या काळात  कॉफी सिद्ध झाल्यावर चहा भविष्य घडवताना कॉफी स्वप्न रंगवताना नितीन सप्रे 020820251040

स्मृतीबनातून – रिक्तता(पद्य)

इमेज
रिक्तता  आता काही न उरले जीवनी तसे काहीच नसते जीवनी स्वप्ने अमाप पाहिली जीवनी पूर्तते पूर्वी, जाग आली जीवनी मारले मन प्रत्येकदा जीवनी मुक्त जगलोच नाही जीवनी लोभ होता ज्यांच्या वरी जीवनी कृतघ्न ते सर्व निघाले जीवनी गमावले सर्वस्व या जीवनी रिक्तता  श्वासागणिक  जीवनी आजन्म भासे, येते सत्य कामी आभास हा नच ये सत्य कामी व्हायचे मुक्त असता या रणी राघव शेला घे तू पांघरूनी  नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  300620251820

स्मृतिबनातून – दिव्यता(पद्य)

इमेज
दिव्यता सोडिले काव्य लावण्य सारे मी संगती असता तुझ्या रे  अलंकारांची अहंता नाही करतील विरस मिलनी मम प्रतिभा वाचाळ उगीच करता तू मधु कानात गूज  ऐकू कसे ते येईल सांग नाही केले जर चित्त स्थिर साक्षात ठाकता पुढे उभा बाळगू मी काव्य गर्व कसा महाकवी तू चरणी तुझ्या तो अर्पून द्यावा भार सारा होता बासरी सम निर्विकार प्रसवती तुझे दिव्य स्वर  सोडुनी सारे माझे विकार आळवीन तो तुझाच सूर नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  120720251935

स्मृतीबनातून–स्वरमंगेशाचा अभिषेकी

इमेज
स्वरमंगेशाचा अभिषेकी प्रारंभिक गणेश बळवंत नवाथे म्हणजेच पंडित जितेंद्र अभिषेकी या नावाने सर्वांना सुपरिचित असलेले विसाव्या शतकातल्या सुरलोकाचे एक कुलपती. संगीत क्षेत्रातील एक अत्यंतिक अधिकारी आदरणीय व्यक्तिमत्व. परंपरा आणि नियमांचा पट्टा गळ्याला घट्ट आवळून घेणं म्हणजे घराणा गायकी असं त्यांनी कधीच मानलं नाही आणि म्हणूनच शास्त्रीय संगीत गायनाची आपली स्वतंत्र शैली त्यांना निर्माण करता आली. ते केवळ शास्त्रीय गायकच नव्हते तर त्या बरोबरीनं नाट्यगीतं, अभंग, भावगीतं, ठुमरी, दादरा, कजरी, टप्पा यासारखे उपशास्त्रीय प्रकारही आशयपूर्ण, रसाळपणे सादर करून त्यांनी अभिजात रसिकांच्या काळजात घर केलं. अगदी लोकसंगीतासह संगीताचे नानाविध प्रकार ते तितक्याच सशक्तपणे रचित, गात असत. याबरोबरच ते एक सुजाण संगीत शिक्षकही होते. संगीत दिग्दर्शनाची हातोटी तर अशी होती की आधुनिक काळात मराठी संगीत रंगभूमीला पुनरुज्जीवित करण्याचं श्रेय निर्विवाद त्यांच्याकडे जातं. त्यांना संस्कृत, उर्दू, पोर्तुगीज या भाषाही अवगत होत्या. एकूणच गायन आणि गायनाधिष्ठित विद्वत्तेचा त्यांचा सुरेल व्यासंग होता. जडण घडण जितेंद्र अभिषेकी यांचं...