पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून –जलाभिषेक(पद्य)

इमेज
जलाभिषेक दाटले नभी कृष्ण घनमेघ मिरवीत सोन किनारी वर्ख क्षणात उजळ क्षणात काजळ आकाशी पाहिला अनोखा खेळ धावत आला पवन धरेवर  धुळी पर्णांचे रगेल तांडव सोनसळी चपलेची सळसळ जलद कडाडा वाजवी पखावज जलधारा ही जाहली अनावर घातले टपोर थेंबाचे छुमछुम  बेभान थिरकली तप्त धरणीवर घडला जलाभिषेक या सृष्टीवर नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  260520251610

स्मृतीबनातून – आकाश–पाणी(माझा क्रुझ प्रवास)

इमेज
आकाश–पाणी (माझा क्रुझ प्रवास) सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या, प्रामुख्यानं आकाशवाणी, दूरदर्शन, फिल्म्स डिव्हिजन आणि अन्य बहुतेक सर्व विभाग मिळून सदतीस वर्षांची माझी प्रदीर्घ सेवा डिसेंबर 2024 मध्ये सुफळ संपूर्ण झाली. सेवानिवृत्ती नंतर झेपेल तितका प्रवास आणि जमेल तेव्हढ लेखन करण्याच्या केलेल्या निर्धाराला अखेरच्या वर्षात, देशी परिघा बाहेर मलेशिया आणि देशांतर्गत शिमला, वाराणसी, आग्रा, मथुरा, वृंदावन, लेपा(खरगोन), भोपाळ, नागपूर, मुंबई अशा प्रवासानी भक्कम क्रियाशीलता लाभली. अशी दमदार पार्श्वभूमी लाभल्यावर, निवृत्ती पश्चात हैदराबाद, मुंबई, नागपूर, पुणे, दिल्ली, प्रयागराज, अयोध्या, गोवा, लक्षद्वीप अशी घोडदौड मी सुरूच ठेवली. आता नमनाला याहून अधिक तेल न जाळता माझ्या एका अनोख्या पहिल्या वहिल्या प्रवास कथेला आरंभ करतो. एक अवकाश यान वगळता, मुख्यतः नोकरी निमित्त, आतापर्यंत बहुतेक सर्व प्रकारच्या, अगदी पाणबुडी, INS मुंबई सारखी युद्धनौका, प्रवासी हेलिकॉप्टर, कमांडो हेलिकॉप्टर, सर्विस एअरक्राफ्ट, रोप वे, ते सायकल, ट्रॅक्टर, बैलगाडी, रेंगी(बैलगाडीतली मोपेड)पर्यंत सर्व तऱ्हेच्य...