स्मृतीबनातून - निशब्द कृती (पद्य)
निशब्द कृती उघड्या नेत्रांस जाळी दाहकता वास्तवाची मिटल्या पापण्यात दाटी भंगलेल्या स्वप्नांची भरून होते घेतले श्वास त्यांनी अमृताचे कळेना निःश्वास त्यांचे हे कैसे झाले विषाचे अधरांवरचे जे प्राशिले शीतल चांदणे अवचित त्यांचे कैसे होऊन गेले निखारे स्पर्शात खास होती अशी जाणीव धुंदगंध गेला उडून आता तो रासलीलेचा सुगंध दुखावल्या भावना त्यांच्या निमित्त काही शब्द केली राख जीवनाची करुनी कृती निशब्द रूप रंग ऐहीकाचे सारे ते भुलविणारे हाक देती संग अलौकिकाचे उजळणारे नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com 230420241140