पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून मृत्यू(पद्य ११६/91)

इमेज
​रवींद्रनाथ टागोर या गीताद्वारे सांगतात की, मृत्यू हा भीतीदायक नसून तो जीवनाचा  'परम सखा'  आहे. ज्याप्रमाणे एखादी नववधू आपल्या पतीची आतुरतेने वाट पाहते, त्याचप्रमाणे कवी मृत्यूची वाट पाहत आहेत. जीवनाचा प्रवास संपवून मृत्यूच्या कुशीत विलीन होणे म्हणजे ईश्वराशी एकरूप होणे होय, असा अनेक आध्यात्मिक संदेश यात दिला 116 बंगाली  ​ओगो मरण, हे आमार मरण, तुमि आमाय कथा कओ। तपोमय येइ तोमार शरण, तुमि आमाय कथा कओ॥ ​कतो ये दिन धरे, आमि तोमार पथे-चेये आछी कतो दुखे सुखे, आछी कतो गान गेये। तोमार चोखेर एकेकटी निमेषे, आमार सकल कथा जालिये देबे तोमार चोखेर, एकेकटी निमेषे॥ ​या-किछु आमार सब तुमि लओ, ओगो मरण, हे आमार मरण। गूँथा हयेछे फुलेर माला, कबे हबे ये बासर-घरे। कबे आमि ये याब चले, तोमार साथे निभृत घरे॥ 91. इंग्रजी  O thou the last fulfilment of life, Death, my death, come and whisper to me! Day after day I have kept watch for thee; for thee have I borne the joys and pangs of life. All that I am, that I have, that I hope and all my love have ever flowed towards thee in depth of secrecy. O...

स्मृतीबनातून – भरती(गीतांजली पद्य ९)

इमेज
​ही कविता सांगते की, ईश्वर हा केवळ मंदिरात नसून तो निसर्गाच्या कणाकणात आणि मानवाच्या आनंदाच्या लहरींमध्ये व्यापलेला आहे. जेव्हा माणूस सृष्टीच्या या अथांग सौंदर्याशी एकरूप होतो, तेव्हा त्याला खऱ्या आनंदाची आणि ईश्वराची प्राप्ती होते. आनंदेरई सागर थेके एसेछे आज बान दाओ गो सभाय छेड़े दाओ गो, भरे निओ गान। आलोक-छायार महामेलाय, आमिओ जे एक कोना, धूलि-कनार माझे आमार आपनके जे जाना। एइ जे आकाश, एइ जे बातास, एइ जे आलोक-धारा सकल सुखेर माझे आमि हयेछि आत्महारा। जेइ दिके तेइ ताहार पावा, जाहार शेष नेइ कभु, आपनार माझपाने ताहारेई खुँजे पावा प्रभु। भरती आनंदेरई सागर थेके (९) आनंद सागरास आज भरती आली वल्हवा जीवन नौका तुम्ही दृढ राहुनी घ्या लादून नौकेत ती दुःखे सारी निर्धार पार जाण्याचा पातला मृत्यू जरी आनंद सागरास आज अशी भरती आली कोण रे तो मागुती फिरण्यास सांगतो कोण रे तो अशी मनाई करतो उत्सव काळी कोण भयाचे स्मरण करतो भय तुमचे ते आम्ही सर्व जाणतो कुठली ग्रहपीडा अन् कुठला शाप तो? सुखे किनारी का बसून राहण्यास सांगतो? धाडसाने धरा रे शिडाच्या दोऱ्या सर्व गाऊ या मिळून सुरेल गीत पर्व आनंद सागरास आज अशी भरती आली नि...

स्मृतीबनातून – मायारूप (पद्य ११०)

इमेज
​गुरुदेव टागोर यांना असे म्हणायचे आहे की, जरी त्यांचे अस्तित्व एका लहानशा 'मातीच्या पणती' सारखे असले, तरी जेव्हा त्यांच्यावर ईश्वराची असीम कृपा आणि आकाशासारखी विशाल करुणा बरसते, तेव्हा त्यांचे रिकामे जीवनही दैवी प्रकाशाने उजळून निघते. हे काव्य म्हणजे पूर्ण समर्पण आणि समाधानाचे गीत आहे. ​ आछे आमार हृदय आछे भरे ओगो, तोमार दान ओइ आकाश-भरे। आछे आमार हृदय आछे भरे।। ​ आमार एइ ये माटीर प्रदीपखानि जेने निले तोमार आलोर बानी, ओगो, तोमार नक्षत्र-प्रदीप-शिखाय जागलो आमार शुन्य घरे।। मायारूप हृदय माझे तव प्रेमाने ओसंडले कर देवा तुझ्याच मनीचे सारे असता तू सदा अंतरी नेमाने घे हरून खुशाल बाह्यांगी सुखे करुनी नष्ट तहान प्राणाची येथे पिपासेतून मी मुक्त व्हावे असे मग मरूभूमीतही तू घेऊनी जावे तप्त रणात मजसी खुशाल फिरवावे मायेचा जो खेळ तुझा चाललासे  सांगतो तुला मला आवडीचा वाटे व्हावा अश्रूपात तो एक नेत्राने दुजा ओसंडून वाहे अतीव मोदे  सर्वस्व ते गमावून बसलो भासे गवसते दिव्य त्यावेळी अधिक ते लोटसी दूर तव अंकावरूनी कोठे उचलून हृदयी घेणार मजसी खासे  आछे आमार हृदय आछे भरे ११० https://youtu.be/iF...

स्मृतीबनातून –प्रकृती (पद्य ४८)

इमेज
आकाश तले उठल फुटे (मराठी अनुवाद) ​आकाशाच्या अंगणात प्रकाशाच्या मंजिरी उमलल्या आहेत, आणि इकडे तिकडे रंगांचा सुगंध दरवळला आहे. ​पृथ्वी आज आनंदाने शहारली आहे, तिच्या हृदयाच्या मध्यभागी जणू बासरी वाजत आहे. इथे सगळीकडे रंगांचा सुगंध दरवळला आहे. ​वाऱ्यावर कोवळ्या पानांचे थवे डोलत आहेत, गवताच्या पात्यावर दवबिंदू झळकत आहेत. ​प्रकाशाने हे विश्व न्हाऊन निघाले आहे, आता ही जीवन-नौका पैलतीराला जाण्यास सज्ज झाली आहे. सगळीकडे रंगांचा सुगंध दरवळला आहे. ​थोडक्यात स्पष्टीकरण: ​टागोरांनी या कवितेत सकाळच्या निसर्गाचे अतिशय विलोभनीय वर्णन केले आहे. जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा केवळ प्रकाशच येत नाही, तर जणू काही रंगांचे सुगंधी फूल उमलते. निसर्गातील चैतन्य पाहून कवीला असे वाटते की ही पृथ्वी आनंदाने थरारत आहे आणि तिच्या कणाकणातून संगीताचे सूर उमटत आहेत. प्रकृती आकाश प्रांगणी कमल उमलत फुलोरा पाकळ्यांचा सजला सर्वत्र झाकले निबीड काजळ कृष्णजळ  बैसलो ब्रह्मासम सुवर्ण कोषात  भोवती अंबुज पसरवी आलोक आकाशी जणू उसळल्या लाटा गगनी समीर वाहू लागला चहूदिशा छेडती गीत स्वर थिरकले प्राण नृत्य सर्वत्र कवटाळ...

स्मृतीबनातून-नक्षत्र धारा(पद्य)

इमेज
वैशाख झळा सोशीत रस्त्याच्या दुतर्फा हिरवा चुडा आणि लालीमा ल्यायलेल्या गुलमोहरानं आज सकाळच्या नाशिक प्रवासात चित्तवृत्ती फुलवल्या. कल्पनांना शब्दांची साथ मिळाली आणि… नक्षत्र धारा आठव तुझे फुलवती पारिजात भेटीत अवघा पसरे सुवास पद रवानी तुझ्या धन्य होती श्रुती सुहास्य मधुमंद गुंगविते मती नेत्र शरांनी सर्वत्र मृदुल घाव अधरांवरी टिपूर पहाट दव  करपाशी तुझ्या अनुभवतो मुक्तता बोलातूनी वाहतो निर्झर गारवा भेटीस येता अशी अधीर चंचला बरसल्या त्या सजल नक्षत्र धारा नितीन सप्रे 100523