स्मृतीबनातून – नश्वर(पद्य)
A Drinking Song by Irish poet William Butler Yeats Wine comes in at the mouth And love comes in at the eye; That's all we shall know for truth Before we grow old and die. I lift the glass to my mouth, I look at you, and I sigh. आयरिश कवी यीट्स यांची हि एक प्रसिद्ध लघू रचनांपैकी एक आहे, कारण ती प्रेम, काळ आणि साध्या-सोप्या आनंदांमधील गोड-कडू नातं केवळ सहा ओळींत टिपते. या कवितेचा अनुवाद न करता उमजलेल्या भावार्थावर लिहिलेलं पद्य नश्वर असवं झिरपे कायेत मुखावाटे तसे झिरपे प्रेम दिठीद्वारे मोद अन् प्रेम जरी सत्य भासे जीवनी ते यामुळे भान हरपे क्षणकाल जरी हे विश्व गमले जरे पुढे सारे ते शरण जाते रिचवी आता जरी आसवं प्याले जाण ठेवी हे नश्वर आहे सारे नितीन सप्रे 041020261000