पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून -सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नांची नुरवी"

इमेज
  " सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नांची नुरवी" श्रीगजाननाला भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्व आहे. तो गणपती आहे म्हणजेच गणांचा, आपणा सर्वांचा तो अधिपती आहे. बहुदा म्हणूनच त्याला आद्य पूजेचा मानही मिळाला आहे. अलीकडे परिस्थिती काहीशी बदललेली असली, तरी साधारण साठ, सत्तरच्या दशकात जन्मलेल्या बहुतेकांना अक्षर ओळखही, त्याचेच स्मरण करून झालेली आहे. आपल्यात तो इतका सामावलेला आहे की एखाद्या गोष्टीची, कार्याची सुरवात करण्याला त्या गोष्टीचा श्रीगणेशा करणे अशी संज्ञाच मिळाली आहे. गणेशाला बुद्धी, युद्ध, यांच्या सह 64 कलांची देवता मानण्यात येत. पूर्वी घराघरांतून होणारी गणेश पूजा काही विशिष्ठ हेतूंनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक उत्सवात रूपांतरीत केली आणि आज तर गणेश उत्सवाने प्रांत, राज्य, देश अश्या सीमा पार केल्या आहेत आणि तो लोकप्रियतेच्या कळसावर आहे. भाद्रपद महिन्यातल्या चतुर्थीपासून (म्हणूनच ती गणेश चतुर्थी) चतुर्दशी पर्यंत(अनंत चतुर्दशी) महाराष्ट्रात आणि आता इतरत्र ही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो. गणरायांच्या उत्सवाची सर्वच उत्सुकतेनं वाट पाहत असतात. गणपती ह...