प्रासंगिक - तालेवार संगीतकार - ओ. पी

तालेवार संगीतकार - ओ. पी. संगीताचा कुठलाही वारसा नसताना, औपचारिक संगीत प्रशिक्षणही झालेलं नसताना, चित्रपट संगीत रसिकांना चार दशकं आपल्या तालावर नाचवणारा जादू नगरी चा जादूगार म्हणजे संगीतकार ओ. पी. चाकोरीबद्ध, साचेबद्ध एकसुरी संगीतापासून कोसो दूर, श्रवणप्रिय, तालप्रधान गीत रचनांचा बेताज बादशहा म्हणजे ओ. पी. आपल्या अजोड, अवीट ठेकेदार संगीत रचानांनी ओ. पीं. नी हिंदी चित्रपट संगीताचा आसमंत असा काही दरवळून टाकला की चहाते, बहोत शुक्रिया, बडी मेहेरबानी म्हणते झाले. ओ. पी. जसे आपल्या भरजरी झगमगीत सांगीतिक कर्तृत्वामुळे लक्षात राहतात तसेच ते आणखी एका गोष्टीमुळे लक्ष वेधून घेतात. हिंदी चित्रपट संगीताच्या अवकाशात सर्वात लयबद्ध आणि सुमधुर संगीत दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओंकार प्रसाद नय्यर (ओ. पी. नय्यर) सारख्या उत्कृष्ट संगीतकाराने हिंदी चित्रपट सृष्टीच्या अनभिषिक्त स्वरसम्राज्ञी कडून एकही गीत गाऊन घेतलेले नाही आणि म्हणूनच ओ. पी. त्यांच्या उत्तमोत्तम रचनांमूळे जसे नावाजले जातात, तितकेच प्रामुख्यानं लक्षात राहतात ते त्यांच्या लता विरहित यशस्वी कारकिर...