स्मृतीबनातून - ओळख(पद्य)

ओळख काय सांगू काय झाले संकटे जैसी चालुन आली मुखवटे एकेक गळून गेले ओळख खऱ्या चेहऱ्यांची झाली मागितले दान नव्हते कुणाला तोवरी सारेच दानशूर होते मागता फक्त धीर थोडा तुडतुडे शब्दांचे सोडले होते होता मार्ग सुखाचा तेव्हा सह प्रवासी सारेच झाले आणुनी आड वाटे वर सगळे एकटे सोडून गेले कळपात जंगली प्राणी मात्रांच्या काही पाळीव होते भासले होऊन नागवी चारित्र्ये त्यांचे तेही पाशवीच ठरले होते नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com 130720241900 घोलवड