पोस्ट्स
जून, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
स्मृतीबनातून 'मागणी'
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

स्मृतीबनातून - 'मागणी' भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीने साहित्यिक मूल्यांनी पुरेपूर, विविध उत्कृष्ट चित्रपट गीतांच्या रूपानी, हिंदी साहित्यात भरीव योगदान दिले आहे. मे मराठीही याला अपवाद नाही आणि अन्य प्रादेशिक भाषांना हे लागू होत असावं. अनेक गीतं ही गेयते बरोबरच अतिशय आशयघन आहेत. विशेषतः 70, 80 च्या दशका पर्यंत निव्वळ ठेका आणि तोंडी लावायाला, खरंतर तोंड हलवायला, शब्दांचे प्रयोजन असा निव्वळ नाचरा प्रवाह फार प्रस्थापित नव्हता. त्या काळातल्या काही गाण्यांनी तर सर्वांच्याच मनावर कायमस्वरूपी गारूड केलं आहे. अशाच एका साठच्या दशकातील गाण्याने साधारण १९८८ च्या सुमारास माझे लक्ष वेधून घेतले. नुकताच आकाशवाणी च्या भोपाळ केंद्रावर रुजू झालो होतो. भारत भवन, रविंद्र भवन ही सांस्कृतिक केंद्रे तसेच माधवराव सप्रे स्मृती संग्रहालय, छोटा तलाव, मोठा तलाव, मुख्यमंत्री निवास आदी ठिकाणं केंद्रापासून हाकेच्या अंतरावरच होती. त्यावेळी मी सडा फटींगच असल्याने मला अनायसेच अनुकूल वातावरण आणि परिस्थिती लाभली होती. मुख्य म्हणजे 'मठी' मधून बाहेर पडणे आणि परतणे या दोन्ही गोष्टी कुणीही नियंत्रित करत नव्हत...