पोस्ट्स

जुलै, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून - 'कर्मयोग'

इमेज
'कर्मयोग' (Note - Image courtesy : Google) कित्येकदा एखादा विषय गहन आहे, क्लिष्ट आहे, आपल्या समजुतीच्या बाहेर आहे असे काही समज (stereos) आपण आपल्या मनात बाळगून असतो. मनाच्या असल्या धारणे मुळे, एखादा प्रांत हा आपला नाही असा निष्कर्षच काढतो. पण दुर्बोधता ही मुळी विषयात नसावी तर ती समजावणार्ऱ्यांच्या मांडणीत असते असे मला वाटते. काही जणांना  दुर्बोध, कठीण असा विषयही सुबोध, सरल आणि सुगमपणे मांडण्याचे कसब साध्य असते.  भारतीय तत्त्वज्ञान विषयक ग्रंथ, भगवद्‌गीतेचच उदाहरण घेतलं तर एखादा व्यासंगी ज्ञानार्जनासाठी  मूळ ग्रंथ वाचेल, त्यावरील टीका वाचेल पण सरसकट सामान्य माणसाला "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन","नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः","वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि" हया श्लोकांची तोंडओळख असेलही पण अठरा अध्याय, सातशे श्लोक असा व्यासंग करणारे लोक निश्चितच मर्यादित असणार.अश्या लोकांपर्यंत गीतेचे तत्वज्ञान पोहोचवायचे असेल तर फार विद्वत्तापूर्ण, जटील विवेचन निश्चितच कामी येणार नाही.  मग असे लोक यापासून विन्मुखच ...