पोस्ट्स

डिसेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून-ब्रेकिंग न्यूज

पत्रकारितेच्या क्षेत्रात 'सर्वप्रथम' आणि 'अचूक' वृत्त देण्यास अनन्य साधारण महत्व आहे. मात्र बरेचदा 'सर्वप्रथम' च्या मोह जाळ्यात अडकल्यामुळे 'अचूकता' हातून निसटते आणि बिकट परिस्थिती उद्भवते. मुळातच तो क्रम 'सर्वप्रथम' आणि 'अचूक' असा असण्याऐवजी 'अचूक' आणि 'सर्वप्रथम' असा आहे. तो तसाच असायलाही हवा. या क्रमात गल्लत झाली आणि बातमी देताना चौकसपणा कमी पडून प्रथमदर्शनी घडामोडीं वरच विसंबून राहिल्यास कसा घात होऊ शकतो याचा अनुभव बहुतेक सर्व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी महाराष्ट्र विधानसभेच्या 2004 साली झालेल्या निवडणुक निकालांनातरच्या राजकीय घडामोडींच्या  वेळी घेतला.  मी त्यावेळी दूरदर्शनच्या वृत्त विभागात संपादक होतो. विधान सभा निवडणुक जाहीर झाली होती. प्रत्यक्षात परिस्थिती बरेचदा वेगळेच चित्र दाखवणारी असली तरी निवडणूक म्हणजे लोकशाहीच्या पवित्र मंदिरातला सर्वात मोठा आणि आवश्यक असा उत्सव. तर अश्या या काळात जनादेश हा विशेष कार्यक्रम करीत होतो. तसच निवडणुकी दरम्यान प्रत्यक्ष फील्ड वर जाऊन  सह्याद्री आणि डी डी न्युज साठी वार्ता...