पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रासंगिक- असेन मी नसेन मी

इमेज
असेन मी नसेन मी अनेकवेळा आणीबाणीची परिस्थिती आणि संयमाधीष्टीत निर्णयक्षमतेचा लागणारा कस यामुळे प्रसारमाध्यमात काम करताना अत्यंत सजगता बाळगावी लागते. इलेक्ट्रॉनिक माध्यमात बातमी लवकरात लवकर तर प्रसारित करावी लागतेच पण तसं करत असतानाच ती अचुक असणे नितांत गरजेचं असतं. मात्र प्रत्यक्षात काम करत असताना अचूकते बाबत शंभर टक्के खातरजमा करण्या इतका वेळ बऱ्याचदा हाताशी नसतो. अश्या प्रसंगी, काहीसा नशिबावर हवाला ठेऊन, इंग्लिश मध्ये ज्याला आपण 'कॅलक्यूलेटेड रिस्क' (calculated risk)म्हणतो, ती घ्यावी लागते. मुंबईत दूरदर्शनच्या वृत्तविभागात वृत्तसंपदानाची जबाबदारी निभावत असताना ६ जून २००२ हा दिवस माझ्यासमोर अशीच आव्हानात्मक परिस्थिती ठाकुन गेला. त्या दिवशी रोजच्या प्रमाणे साडेनऊ च्या बातमीपत्राची जुळवाजुळव सुरू होती. वृत्तसंस्था, वार्ताहर, प्रतिनिधी आदीं कडून मिळणाऱ्या बातम्यांची निवड, उपलब्ध चित्रफिती, आयत्यावेळी उपलब्ध होऊ शकणाऱ्या चित्रफिती यांचा क्रम निश्चित करून त्या संपादनासाठी पाठवणे, ताज्या घडामोडींचा पाठपुरावा असे संध्याकाळी सात आणि रात्री ९.३० वाजताच्या बातमीपत्रासाठीचे कामकाज स...