पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रासंगिक - ' राजा ' माणूस

इमेज
' राजा ' माणूस ‘तेरे बिन सावन कैसा बीता’ आणि ‘मैं देखू जिस ओर सखी रे’ ही ‘जब याद किसी की आती है’ आणि ‘अनिता’ चित्रपटातील गाजलेली गीतं रसिकांच्या आजही स्मरणात आहेत. गीतकाराला मात्र ही रसिक मान्यता अनुभवता आली नाही, कारण हे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच राजा मेहदी अली  खान, 29 जुलै, 1966 रोजी हे जग सोडून गेले होते. हे दोन्ही चित्रपट त्यांच्या मृत्युनंतर 1967 मध्ये प्रदर्शित झाले. एका पेक्षा एक सरस, रोमँटिक, अर्थवाही, काही गुह्य आणि लोकप्रिय गीतांद्वारे त्यांनी बॉलीवूड मध्ये अजोड कामगिरी करून ठेवली. झेलम(पाकिस्तान) इथे जन्मलेला हा मुलगा शायरीच्या वेडापायी जमीन जुमल्यावर पाणी सोडून देतो आणि लेखक म्हणून आकाशवाणी दिल्लीत आपली कारकीर्द सुरू करतो. ईथे त्यांचा परिचय उर्दुचे प्रसिद्ध लेखक सादत हसन मंटो यांच्याशी होतो ते मेहदी यांना मुंबईला आणतात. अशोक कुमार यांच्या मदतीनं 1946 च्या सुमारास त्यांना एक चित्रपट सुरवातीला  मिळाला ज्यात त्यांनी अभिनयही केला. पुढे 1947 साली फाळणी च्या वेळी त्यांनी आणि त्यांच्या पत्नी ताहिरा यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. धनदौलत सोडून आलेल्या आणि शब्...