रांची - एक आनंदानुभव

रांची - एक आनंदानुभव बरेचदा काही स्थळांबद्दल,काही व्यक्तींबद्दल अकारण आपली दृष्टी पूर्वग्रह दूषित असते. काही वेळा एखाद्या व्यक्ती विषयी अथवा जागे विषयी आपल्या मनात नकारात्मक संकल्पना असतात आणि त्या खोट्या ठरल्या तर आश्चर्याचा सुखद धक्का अनुभवायला मिळतो. काही गावां विषयी अशाच काही नकारात्मक संकल्पना उगाचच माझ्याही मनात होत्या मात्र सुदैवाने त्या खोट्या ठरून मला आनंददायी अनुभव देऊन गेल्या. सहज फिरायला म्हणून तर सोडाच कामा निमित्त देखील कधी झारखंडच्या राजधानी रांची (Ranchi)शहराचा दौरा करावा लागण्याची शक्यता माझ्या दृष्टिपथात नव्हती. आमच्या खानदानातील कुणी कधी रांचीला गेल्याचे मला स्मरत नाही आणि कुणी कधी जाईल अशी शक्यता ही नसतांना अगदी अचानक तसा योग आला. झारखंड(Jharkhand) हे आदिवासी बहुल राज्य, मागासलेले त्यातून नक्षलग्रस्त वगैरे धारणा मनात राखून मी रांचीत अवतरलो होतो मात्र रेल्वे स्टेशन वरून मुक्कामाच्या ठिकाणी करमटोलीला पोहोचेपर्यंत अद्ययावत ब्रँड च्या मोठ मोठ्या शोरूम्स, आधुनिक दुकाने, मॉल्स, हॉटेल्स, दक्षिण भारतीय खाद्यपदार्थां पासून चायनीज इटरीज यांनी सोबत केली. मुक्काम प्रेस क्लब(Pre...