पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून - मौक्तिकावीण शिंपा

इमेज
  मौक्तिकावीण शिंपा संध्यार्तीची वेळ. सकाळच्या पहिल्या किरणा पासून चैतन्याची पखरण करणारा गगनराज आता दुसऱ्या गोलार्धात प्रकाशण्यासाठी, निरोप घेऊ पाहात होता. पश्चिम क्षितिजा वर जणू काही केशर सडा शिंपला होता. त्या भास्करानं निरोप घेतल्या मुळे की काय कोण जाणे अंतरात काहीशी उदास भावनाही रेंगाळत होती. संध्याकाळची अशी ही वेळ तृप्ती बरोबरच मनाला काहीशी हुर हूर लावून जाते. अश्या अवस्थेचं जगदीश खेबुडकर यांनी एका गीतात, फार समर्पक वर्णन केलं आहे. 'तृषा वाढते तृप्त या लोचनांची' एकाचवेळी तृप्ती आणि तृषार्ततेची भावना मनात रुंजी घालतात, ती ही वेळ. अश्या वेळी तिची साथ नसेल तर पश्चिमेचा शीतल समीर, चांदणं हे सुद्धा मन पोळून टाकतं.  धरतीनं नेसलेल्या हिरव्या शालुवर पहाटे हलकेच पडलेला स्वर्गीय प्राजक्त सडा किती विलोभनीय असतो पण जर तिची चाहुल ही नसेल तर मग अशी आरास काय कामाची? जर का तिची साथ नसेल तर साध्या, सोप्या, सरल वाटेवरची वाटचाल ही कठीण होऊन बसते. या प्रवासात वारंवार तोल जाऊ लागतो. प्राजक्त, जाई, जुई सारख्या सानुल्या फुलांचा ही मनाला भार वाटू लागतो. पण या व्यथा कुणाला कश्या कळणार? जिवलगाच्या ...

स्मृतिबनातून - किमयागिरी - स्वर,शब्द,सुर

इमेज
  किमयागिरी - स्वर,शब्द,सुर मराठीतल्या एका सर्वतोपरी लावण्यपूर्ण भावगीताशी तुमची पुनर्भेट (Reunion)घडवून आपल्या सर्वांचीच यंदाची दीपावली (Deepawali) लखलखत्या स्वरज्योतींनी उजळवून टाकण्याचा मानस होता. मात्र लेख पूर्ण करता करता आलेल्या बातमीमुळे या उजळलेल्या ज्योतींना आता आसवांची सर्द किनार मिळाली आहे. या नितांत सुरेल कृतीचा कर्ताच आपल्या गाणाऱ्या व्होयोलिन सह अनंताच्या यात्रेचा पांथस्थ झाला. दूर निघून गेला. हे गानशिल्प साकारणाऱ्या त्रिगुणात्मक त्रिमुर्तीतला अखेरचा प्रतिभावान प्रभाकर रविवारी मावळला….. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सॲप चाळत असताना संगीतकार, गायक सुधीर फडके(#Sudhir Phadke) यांच्या जयंती निमित्त शेखर जोशी या माझ्या पत्रकार मित्राची पोस्ट समोर आली. एका आर्त भावगीताची जन्म कहाणी तो सांगत होता. बसच्या प्रवासा दरम्यान संगीतकाराला चाल सुचते. त्या चालीचं नोटेशन तो तिकिटाच्या मागे लिहून ठेवतो आणि घरी गेल्यावर संगीतरचना पूर्ण करतो. आता या चालीला शब्दांची साथ लाभली तर उत्तम भावगीताचं सृजन शक्य असल्याचं वाटत आणि डोळ्यापुढे पहिलं नाव ज्या गीतकाराचं येत त्याला तो ते नोटेशन आंतरदेशीय पत्...