पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून-एका गीता(नज़्म) मागचं कवित्व

इमेज
एका गीता (नज़्म) मागचं कवित्व सुखाची अभिलाषा ही निश्चितच मानवी जीवनाची प्रेरणा आहे. तर दु:ख आणि वेदना हे मानवी जीवनाचे प्रखर वास्तव आहे. सुखाच्या शोधात मार्गस्थ झलेलेल्या  प्रवाशाला, कधी न कधी दुःखाला, वेदनेला सामोरे जावेच लागते आणि जर मामला ‘दिल्लगी’ चा असेल तर मग होणाऱ्या जखमेच्या खोलीची तुलना सागर तळाशीच होऊ शकते. आकाशवाणीच्या विविध भारती केंद्रावर प्रसारित होणारे छायागीत, बेला के फूल, हे चित्रपट संगीताचे कार्यक्रम ऐकणे हा पूर्वी माझ्या कामाचा एक भाग होता, आता हे एक आरामदायी छंदकाम आहे. बऱ्याच वर्षांनंतर अलीकडेच, 'दिल्लगी चा दर्द'  विषद करणारी, एक निरतिशय भावोत्कट गझल पुन्हा एकवार कानावर आली. एस.एच. बिहारी यांच्या लेखणीतून झरलेल्या या गीताचा ( नज़्म ) एक एक शब्द एखाद्या बाणा प्रमाणे आपल्या हृदयाचा वेध घेतो. विकल मन असाह्यतेने झुरू लागते. ओ.पी.नय्यर सारख्या बहुआयामी संगीत दिग्दर्शकाच्या हाती जेव्हा अशी एखादी पद्यावली (#Geet, #Najma) येते आणि जेव्हा ती आशा भोसले सारख्या स्वर मलिकेच्या सिद्ध गळ्यातून प्रवाहित होते तेव्हा स्वर्ग दोन बोटे ही उरत नाही. ही धराच स्वर्गमय भासमान होते...