स्मृतिबनातून - "क्यूँ आंधी में दीप जलाया"

" क्यूँ आंधी में दीप जलाया " जानेवारी चा महिना संपत आलेला. जुन्या वर्षाच्या शेवटाला आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला हवेत असलेला बोचरा गारवा निवळून, तनामनाला तजेला देणारं वातावरण होतं. उत्तराखंडचे प्रवेशद्वार म्हणता येईल अश्या काठगोदामचा मैदानी भाग पार करून हिमालयाचे दर्शन घडवणाऱ्या वळणदार पहाडी रस्त्याला आमची गाडी लागली होती. संगीताच्या सोबतीनं प्रवास ही माझ्यासाठी नेहमीच आनंद पर्वणी असते. त्यातच योगायोगाने एनिव्हिओला अनुभवायला मिळाला.(जी ए कुलकर्णीच्या कथेतला शब्द. द्राक्षाचा रस ज्या क्षणी मद्य होतो तो जादुई क्षण) 'मनमौजीत'लं साधनावर चित्रित झालेलं, ' मैं तो तुम संग नैन मिला के हार गयी सजना,' हे गाणं कानात सुरू झालं. मैं तो तुम संग नैन मिलाके (click to listen) लता दीदींच्या अनेक उत्कृष्ट गीतां पैकी हे एक गीत. मुखड्यातल्या ' नैन ' वर मुरकी, आंदोलन घेत, हृदयावर धारदार सुरी चालावी, असा दिलखेचक लागलेला शुद्ध धैवत ऐकला की आपण आपोआप या गाण्याच्या प्रेमातच पडतो. गाण्याची पारायणंही अपरिहार्य होऊन बसतात. ( संगीताशी प्रीती असली तरी रीती साठी बरेचदा शास्त्रीं ...