स्मृतीबनातून-भ्रम(पद्य)

भ्रम चाहूल तिच्या पदरवाची हृदयास फुटली पालवी निकट नाही तिची फिरकली जरी सावली मोहून मी प्राशिले निर्झराचे ते चांदणे घेऊनी प्राण गेले लाघवी विष हो ते! दूर होती चंद्रकळा भासली सुंदर शितळ उमगले घेता जवळ हा तर नितळ कातळ ठेचीले मी जगातले गारद्यांचे वार सारे घराच्या अंगणात रे हाय शिरकाण झाले. नितीन सप्रे 210323