वसंतवैभव-कैवल्य गान पावसाळ्यातली अशीच एक संध्याकाळ. पावसाच्या झडी पासून बचाव व्हावा म्हणून सहा-सात वर्षांचा मुलगा एका इमारतीच्या जिन्यात उभा राहून आपल्याच तंद्रीत गुणगुणत होता. त्याची तंद्री भंग पावली ती, खांद्यावर अचानक थबकलेल्या हाता मुळे. सकृद्दर्शनी अतिसामान्य वाटणारी ही घटना. पण ती संध्याकाळ विशेष होती आणि घटनाही. त्या संध्याकाळी घडलेल्या या घटनेच्या गर्भात अखिल भारतीय कीर्तीचा तेजोमयी गंधर्व घडवणारं बीज होतं...होय तो खांद्यावर थबकलेला हात होता, ग्वाल्हेर घराण्याचे गायक, नागपुरातल्या श्रीराम संगीत विद्यालयाच्या श्री शंकरराव सप्रे यांचा आणि ज्याच्या खांद्यावर तो हात पडला तो खांदा होता भविष्यात अलौकिक प्रतिभेचा, संगीत क्षेत्राला ललामभूत ठरलेल्या स्वराधीश डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा. त्या संध्याकाळी सप्रे गुरुजींच्या पारखी/तय्यार कानांवर छोट्या वसंताचे गुणगुणणे पडले आणि ते इतके मोहित झाले की ते त्याला वर गायन शाळेत घेऊन गेले आणि नाव-गाव वगैरे विचारणा करत, गाणं कुणी शिकवलं आणि कुठली गाणी येतात म्हणून चौकशी केली. गोड गळ्याच्या आपल्या आई कडून भजनं, नाट्य-गीत...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा