पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून - कैवल्य चांदणे(पद्य)

इमेज
  कैवल्य चांदणे या नदीच्या पार तेथे, गाव माझे छानसे सोडूनी या भव बंधनास मुक्त विसावे असे कहाण्या सांगू किती, नाही काहीच तिथे उणे राहूनी दूर 'त्या' पासूनी कष्टावले आता जिणे   गावात माझ्या वाहती, शुभ्र स्फटिका सम  निर्झरे तरुराजीत गर्द त्या, कूजती मधू पांखरे क्षितिज राउळी, निरांजन ते, स्वये भास्कराचे तेवते शशी तारकांची,  सम शीतल अशी, आभाळमाया दाटते सांज वेळी खग निघती, परत अपुल्या  घरट्याकडे कुडीतल्या पंचप्राणा, जाऊया चल निज धामा कडे घेऊनी सारा आस्वाद झाला मायेच्या या विभ्रमांचा दाटेल सुख सर्वत्र जैसा बघशील चेहरा स्वरूपाचा का शिणवितो जीव हा त्याग ऐहिकाचे भोगणे एकल परी असावी आस लाभावे कैवल्य चांदणे नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com 2703242237

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

इमेज
देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती कवी कोणाला म्हणायचं? जो कविता करतो तो कवी असं रूढार्थाने मानलं जातं. मात्र जो कविता करतो, तो कवी नसतो असं मराठी सारस्वतातील चोखंदळ रसिक खेळिया म्हणजेच पु.ल. देशपांडे यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे. ते वास्तवही असावं. खऱ्या कवीच्या अंतरंगात काव्य बीज मुळातच असतं आणि शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी या उक्ती नुसार सरस्वतीच्या कृपेनं ते बीज कधीतरी अंकुरतं. काही सुदैवी संवेदनशील सुजाणांच्या बाबतीत त्यातूनच आशय लोभस काव्य वेल बहरते. गोव्याच्या कुडचडे इथे जन्मलेले बोरी गावाचे बाळकृष्ण भगवंत बोरकर म्हणजेच बा.भ. बोरकर उपाख्य बाकीबाब हे शारदेच्या कृपा प्रसादाला पात्र ठरलेले असेच एक सुदैवी, सुजाण आणि काव्यासक्त कवी होते.  बोरकरांच्या कविता वाचताना त्या त्यांनी केल्या असं न वाटता त्या प्रगटल्या असंच प्रकर्षानं जाणवतं. दूरदर्शनवर झालेल्या एका कार्यक्रमात स्वतः बोरकरांनी काव्य स्फुर्तीचा किस्सा सांगितला होता. अगदी लहानपणा पासून त्यांच्या कानावर विविध प्रकारे कवितेचे संस्कार आपसूक घडतं होते. त्यांच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या असलेली भजन परंपराही त्यांना पोषक ठरली. बोरकर...