स्मृतीबनातून - कैवल्य चांदणे(पद्य)
कैवल्य चांदणे
या नदीच्या पार तेथे, गाव माझे छानसे
सोडूनी भवबंध आता मुक्त व्हावे असे
कहाण्या सांगू किती, काहीच ना तिथे उणे
सांगतो दूर त्या पासून ना आता राहणे
गावी माझ्या वाहती, स्फटिका सम निर्झरे
गर्द तरुराजीत त्या, कूजती मधू पाखरे
क्षितिजी निरांजन भास्कराचे ते तेवते
तारकांची शीतल आभाळमाया दाटते
सांज वेळी खग हे निघाले घरट्याकडे
कुडीतल्या प्राणा जाऊया निज धामा कडे
घेतला आस्वाद सारा मायेच्या विभ्रमांचा
दाटेल सुख बघता चेहरा स्वरूपाचा
शिणवितो का जीव त्याग ऐहिक भोगणे
एक असो आस लाभावे कैवल्य चांदणे
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
2703242237
या नदीच्या पार तेथे, गाव माझे छानसे
सोडूनी हे भवबंध आता, मुक्त विसावे असे
कहाण्या सांगू किती, काहीच ना तिथे उणे
सांगतो मनी, त्यावाचून आता ना राहणे
सोडूनी हे भवबंध आता, मुक्त विसावे असे
कहाण्या सांगू किती, काहीच ना तिथे उणे
सांगतो मनी, त्यावाचून आता ना राहणे
गावात माझ्या वाहती, स्फटिकासम निर्झर
गर्द तरुराजीत त्या, कूजती मधु-पाखर
क्षितिजी निरांजन भास्कराचे ते तेवते
तारकांची शितल छाया आभाळी दाटते
गर्द तरुराजीत त्या, कूजती मधु-पाखर
क्षितिजी निरांजन भास्कराचे ते तेवते
तारकांची शितल छाया आभाळी दाटते
सांजवेळी हे खग निघाले, आपुल्या घरट्याकडे
कुडीतल्या प्राणा चल जाऊया, निजधामाकडे
घेतला आस्वाद सारा, मायेच्या विभ्रमाचा
दाटेल सुख पाहुनी, चेहरा त्या स्वरूपाचा
कुडीतल्या प्राणा चल जाऊया, निजधामाकडे
घेतला आस्वाद सारा, मायेच्या विभ्रमाचा
दाटेल सुख पाहुनी, चेहरा त्या स्वरूपाचा
शिणवितो का जीव, त्यागून ऐहिक भोगणे
एक आस हीच, लाभावे 'कैवल्य-चांदणे'
एक आस हीच, लाभावे 'कैवल्य-चांदणे'

वा! नितीन जी,
उत्तर द्याहटवाखूप छान भाव व्यक्त झालेत.
कैवल्याचे चांदणे ज्यांना लाभतं ते
भाग्यवंत।
सुरेख आहे
'मन चलो निज निकेतने' ह्या स्वामी विवेकानंद यांच्या भजनातला भाव अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही चपखलपणे ताडला. मन:पूर्वक धन्यवाद.
उत्तर द्याहटवा