पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतीबनातून –जलाभिषेक(पद्य)

इमेज
जलाभिषेक दाटले नभी कृष्ण घनमेघ मिरवीत सोन किनारी वर्ख क्षणात उजळ क्षणात काजळ आकाशी पाहिला अनोखा निसर्गखेळ धावत सुटला पवन धरेवर  धुळी पर्णांचे रगेल तांडव सोनसळी चपलेची सळसळ जलद कडाडा वाजवी पखावज जलधारा ही जाहली अनावर घातले टपोर थेंबाचे छुमछुम  बेभान थिरकली तप्त धरणीवर जाहला स्वर्गीय तो जलाभिषेक नितीन सप्रे nitinnsapre@gmail.com  260520251610

स्मृतीबनातून – आकाश–पाणी(माझा क्रुझ प्रवास)

इमेज
आकाश–पाणी (माझा क्रुझ प्रवास) भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या, प्रामुख्यानं आकाशवाणी,दूरदर्शन, फिल्म्स डिव्हिजन आणि अन्य बहुतेक सर्व विभाग मिळून सदतीस वर्षांची माझी प्रदीर्घ सेवा डिसेंबर 2024 मध्ये सुफळ संपूर्ण झाली. शेवटची पाच वर्ष डी डी न्यूज नवी दिल्लीत नियुक्त होतो. सेवानिवृत्ती नंतर झेपेल तितका प्रवास आणि जमेल तेव्हढ लेखन करण्याच्या केलेल्या निर्धाराला अखेरच्या वर्षात, मी विशेष असे प्रयत्न न करताही एका मीटिंग निमित्त मलेशियाला पाठवून आणि देशांतर्गत शिमला, वाराणसी, आग्रा, मथुरा, वृंदावन, लेपा(खरगोन), भोपाळ, नागपूर, मुंबई अशा प्रवासासाठी मला मोकळीक देऊन माझ्या निर्धाराला ऑफिसानं ही एकप्रकारे सक्रीय पाठिंबा दिला. यासाठी सहकारी, वरिष्ठ यांचं ऋण मान्य केलं पाहिजे. अशी दमदार पार्श्वभूमी लाभल्यावर, निवृत्ती पश्चात हैदराबाद, मुंबई, नागपूर, पुणे, दिल्ली, प्रयागराज, अयोध्या, गोवा, लक्षद्वीप अशी घोडदौड मी सुरूच ठेवली. आता नमनाला याहून अधिक तेल न जाळता माझ्या एका अनोख्या पहिल्या वहिल्या प्रवास कथेला आरंभ करतो. एक अवकाश यान वगळता, मुख्यतः नोकरी निमित्त, आतापर्य...