एक मुलाखत कथा अंतरीचे प्रतिबिंब दिवाळी अंक 20257
एक मुलाखत "Is there any red light area in your city?" कर्नल विक्रम सिंग यांनी फर्ड्या इंग्रजीत विचारलेल्या पहिल्याच प्रश्नानी निखिल नाही म्हटलं तरी थोडा गोंधळला. साहजिकच होतं. आयुष्यात तो प्रथमच इंटरव्ह्यू बोर्डाला सामोरा जात होता. हा प्रश्न त्याला संपूर्ण अनपेक्षित होता. सरकारी कार्यालयात भरावयाच्या एका जागेसाठी देशभरातून तब्बल 40 उमेदवार मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते; हे कळल्या पासूनच आपली निवड अशक्य आहे असं त्याला वाटून गेलं होतं. त्याला कारणं ही तशीच होती. एक तर मुलाखतीला आलेल्यांपैकी अर्ध्याहून अधिक उमेदवारांची शैक्षणिक पात्रता निखिलपेक्षा अधिक होती. पाच, सहा जण तर इंजिनीयर आणि डॉक्टर होते. दुसरं कारण, याला वगळता अन्य प्रत्येकाकडे दोन ते पाच वर्षांच्या अनुभवाची प्रमाणपत्रे होती. काय करावं ते निखिलला सुचेना. त्याच्या समोर टेबलावर पाण्याचा ग्लास होता. "may I have this water please?" स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी काही क्षण मिळावे म्हणून त्यानी समयसूचकता दाखवून हा ड्रिंक्स इंटरवल घेतला. पाणी पिण्यासाठी मिळालेल्या वेळेत परम सुपर कॉम्प्युटर पेक्षाही जलद गतीनं त्य...