पोस्ट्स

जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कविराज : दर्शनिक गीतकार

इमेज
कविराज : दर्शनिक गीतकार प्रीती आणि क्रांती ‘ओ सजना बरखा बहार आइ रस की फुआर लायी’ या सारख्या सरल, तरल, उत्कट सदाफुली शब्दांतून हळुवार प्रीत भावना फुलवणारा कवी आणि ‘ हर जोर जुलूम की टक्कर में हडताल हमारा नारा है’ असा क्रांतीचा जळजळीत एल्गार करणारा कॉमरेड, या कुणी दोन भिन्न व्यक्ती नसून एकच आहे असं सांगितलं; तर सकृतदर्शनी कुणाचाही विश्वास बसणं कठीण आहे. पण हे निखळ सत्य आहे. या परस्पर विरोधी भावनांची अभिव्यक्ती  शंकरदास केसरीलाल उर्फ शैलेंद्र या एकाच व्यक्तीच्या लेखणीतून साकारली आहे.  ऐन तारुण्यात ध्येयवादाच्या अश्वावर आरूढ, वर्गसंघर्षावर मनात धगधगत असलेली आग शब्दरूपातून व्यक्त करणाऱ्या या प्रतिभावान कवीनं सामान्य माणसाच्या सुखदुःखाची, प्रीतीची, जीवन विषयक गहन तत्त्वज्ञान सांगणारी अनेक गीतं अगदी सरल शब्दात रचून आपल्या अमोघ काव्य प्रतिभेचा जणू पुरावाच सादर केला.  साध्या शब्दांतून अर्थाशयाची सखोल दार्शनिकता उलगडून दाखवणं ही मुळी त्याची विशेषता.  पण शब्दांच्या फुलोऱ्यानी चरितार्थ सजवता येत नसतो. म्हणून संसाराची गाडी रुळावर ठेवण्यासाठी या  संवेदनशील, अवलिया कवीनं...

स्मृतीबनातून – ‘बी’यांचा चाफा

इमेज
  ‘ बी’ यांचा चाफा कवी बी(Bee) मराठी भावसंगीत विश्वात काही गाणी अजर अमर होऊन गेली आहेत. “ चाफा बोले ना” हे गीत त्यापैकीच एक. पन्नास वर्षांहून अधिक काळ उलटला तरी रसिक मनावरची त्याची मोहिनी लवलेश मात्र कमी झालेली नाही. या काव्याबाबत जाणून घेण्याआधी केवळ प्रसिद्धीलाच सिद्धी न मानणाऱ्या त्याच्या कर्त्या विषयी ही थोडी माहिती घेऊया. चाफा या कवितेचे कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ ‘ बी’ हे वैदर्भीय. तसं हे घराणं जरी कुलाबा जिल्ह्यातल्या वाशी गावाचं. वडील सरकारी नोकरी निमित्त विदर्भात आले आणि तिथेच स्थाईक झालेत. कवीचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूरचा. शिक्षणासाठी ते अमरावती, यवतमाळ इथे राहिले. मात्र घराच्या परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता आले नाही आणि विधी खात्यात कारकुनाची नोकरी धरावी लागली. त्याकरता त्यांना मूर्तिजापूर, वाशीम, अकोला अशी भटकंती करावी लागली. अठराव्या वर्षीच त्यांना कविता स्फुरू लागली. 1891 मध्ये त्यांची प्रणयपत्रिका ही पहिली कविता हरिभाऊ आपटे यांच्या करमणूक मध्ये प्रकाशित झाली होती. मात्र दुसऱ्या कवितेसाठी मध्ये दोन दशकांचा कालावधी जावा लागला. 1911 मध्ये त्यांनी बी य...