स्मृतीबनातून 'मागणी'
स्मृतीबनातून - 'मागणी'
भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीने साहित्यिक मूल्यांनी पुरेपूर, विविध उत्कृष्ट चित्रपट गीतांच्या रूपानी, हिंदी साहित्यात भरीव योगदान दिले आहे. मे मराठीही याला अपवाद नाही आणि अन्य प्रादेशिक भाषांना हे लागू होत असावं. अनेक गीतं ही गेयते बरोबरच अतिशय आशयघन आहेत. विशेषतः 70, 80 च्या दशका पर्यंत निव्वळ ठेका आणि तोंडी लावायाला, खरंतर तोंड हलवायला, शब्दांचे प्रयोजन असा निव्वळ नाचरा प्रवाह फार प्रस्थापित नव्हता. त्या काळातल्या काही गाण्यांनी तर सर्वांच्याच मनावर कायमस्वरूपी गारूड केलं आहे. अशाच एका साठच्या दशकातील गाण्याने साधारण १९८८ च्या सुमारास माझे लक्ष वेधून घेतले. नुकताच आकाशवाणी च्या भोपाळ केंद्रावर रुजू झालो होतो. भारत भवन, रविंद्र भवन ही सांस्कृतिक केंद्रे तसेच माधवराव सप्रे स्मृती संग्रहालय, छोटा तलाव, मोठा तलाव, मुख्यमंत्री निवास आदी ठिकाणं केंद्रापासून हाकेच्या अंतरावरच होती. त्यावेळी मी सडा फटींगच असल्याने मला अनायसेच अनुकूल वातावरण आणि परिस्थिती लाभली होती. मुख्य म्हणजे 'मठी' मधून बाहेर पडणे आणि परतणे या दोन्ही गोष्टी कुणीही नियंत्रित करत नव्हते. माझा बराचसा वेळ कार्यालयीन कामकाज संपल्या नंतरही त्या परिसरातच जायचा. मुख्यत्वे ड्युटी रूम मध्ये. ही जागा म्हणजे अधिकारिक तरीही एकप्रकारच्या सांस्कृतिक कट्टया सारखी.
या कट्टयावर त्या दिवसाचे प्रसारण संपण्यापूर्वीची मैफिल रात्री जमली असतानाच विविध भारतीवर 'छायागीत' मध्ये लागलेल्या 'आपकी परछाइयां' चित्रपटातल्या एका गाण्याचा मुखडा आकर्षित करून गेला.
"अगर मुझ से मुहब्बत है मुझे सब अपने ग़म दे दो
इन आँखों का हर इक आँसू मुझे मेरी क़सम दे दो
अगर मुझ से मुहब्बत है"……………..
इन आँखों का हर इक आँसू मुझे मेरी क़सम दे दो
अगर मुझ से मुहब्बत है"……………..
अतिशय बाळबोध शब्द, मदन मोहनजींची संगीत रचना, दरबारीचे सुर आणि लता दीदीं च्या गळ्यातून लीलया निघणारे 'गम' 'आँसू' व 'सनम' या शब्दांचे मींड, मुरकी सह सालंकृत वळणदार आर्जवी उच्चार. मन मुग्ध तर झालंच आणि विचार आला की, ग़म दे दो? अशी जगावेगळी मागणी कुणी एखादी 'ती' त्याच्याकडे कशी काय करू शकते?
विचारात गुंग असतानाच मुखड्यात तिनं व्यक्त केलेल्या मागणी कडे संशयानं बघितल्याबद्दल आता काहीशी अपराधीपणाची भावना सतावू लागली कारण निर्व्याज प्रेमाला नव्या उंचीवर नेत ती म्हणते….
" तुम्हारे ग़म को अपना ग़म बना लूँ तो क़रार आए
तुम्हारा दर्द सीने में छुपा लूँ तो क़रार आए
वो हर शय जो तुम्हें दुख दे मुझे मेरे सनम दे दो
अगर मुझ से मुहब्बत है………...
तुम्हारा दर्द सीने में छुपा लूँ तो क़रार आए
वो हर शय जो तुम्हें दुख दे मुझे मेरे सनम दे दो
अगर मुझ से मुहब्बत है………...
आता तर तिचा निर्धार अधिकच सुस्पष्ट होतो आणि दुःखात सहभागी करून घेण्याचा आगळावेगळा लकडाच त्याच्या मागे ती लावते.
"शरीक-ए-ज़िंदगी को क्यूँ शरीक-ए-ग़म नहीं करते
दुखों को बाँट कर क्यूँ इन दुखों को कम नहीं करते
तड़प इस दिल की थोड़ी सी मुझे मेरे सनम दे दो
अगर मुझ से मुहब्बत है".....……….
दुखों को बाँट कर क्यूँ इन दुखों को कम नहीं करते
तड़प इस दिल की थोड़ी सी मुझे मेरे सनम दे दो
अगर मुझ से मुहब्बत है".....……….
एव्हाना तिच्या मागणी बाबत साशंकतेचं धुकं संपूर्णतः विरलेलं असतं आणि ती अधिकारीक वाणीनं त्याला बजावते
" इन आँखो में न अब मुझको कोई आँसू नजर आए, सदा हसती रहें आंखे सदा ये होठ मुसकाये, मुझे तेरी सभी आहें सभी दर्द-ओ-अलम दे दो अगर मुझ से मुहब्बत है"............................
गीतकार राजा मेहेदी अली खाँ यांनी रंगवलेली, कल्पिलेली ही नायिका बहुदा कथा, कविता, कादंबरी आणि चित्रपटातच भेटत असावी, ती वास्तवातही अवतरली तर वेदना, दुखः ही मोहरुन जाईल, बहरून जाईल. नाही का?
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
8851540881
8851540881
Nitin, your write up covers the era of lyrics which touched our hearts. You have expressed so well.
उत्तर द्याहटवाThanks
हटवाअप्रतिम. आयुष्यात असे कुणी जोडीदार म्हणून लाभणे ही पुर्वपुण्याईच. जर पावलोपावली साथ देणारा, निर्व्याज प्रेम करणारा साथीदार लाभला तर आयुष्य सुंदर होवून जाते. मला गुरु रुपात तो साथीदार लाभला आहे.
उत्तर द्याहटवाव्वा!
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवाअप्रतिम लेख आणि 👏👏👏👏🙏🙏🙏असेच लिहित रहा सर
उत्तर द्याहटवानितीनजी,
उत्तर द्याहटवामला हे गीत खूप खूप आवडते।तुम्ही सहज उलगडवून दाखवून दिले आहे या गाण्यातील भावभावना। धन्यवाद।