स्मृतीबनातून –मुक्त झंकार (पद्य)
मुक्त झंकार आता मनास काही उर लीच खंत नाही फेसाळ होता समुद्र गेला सुकून तोही गर्दीत माणसांच्या शोधित राहिलो साव सारे बेरके हे खेळले आपापला डाव वाचाळ शहाण्यांनी सगळा अनर्थ केला अन अर्थ जीवनाचा मौनात दडून गेला धावलो उगाच होतो मागे मृगजळाच्या उमजले उशिरा तो मार्ग नव्हे सुखाचा बरसल्या मेघा परी मानस रिक्त होता हृदयी झंकार झाला निर्गुण ईश्वराचा विरले आभास हे सत् जागले मनात घुमला स्वर पावरीचा दूर तो वनात नितीन सप्रे 120320262140