स्मृतिबनातुन -ठेहरिये होश में आऊ तो चले जाईएगा……….

ठेहरिये होश में आऊ तो चले जाईएगा………. तीन दशकां हुन अधिक काळ हिंदी चित्रपट सृष्टीत संगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रात मोहंमद झहूर खय्याम हाश्मी म्हणजेच खय्याम यांनी आपली अमीट छाप उमटवली. लहानपणा पासूनच खय्याम यांना शिक्षणात विशेष रुची नव्हती मात्र त्यांचा संगीता कडे ओढा होता. दिल्लीत काकांकडे पळून आलेल्या खय्याम यांना काकांनी शाळेत दाखल तर केलं मात्र चित्रपट सृष्टीचं त्याला असलेलं आकर्षण पाहता काकांनी त्याला संगीत शिकण्याची मुभा दिली. पंडित अमरनाथ हे खय्याम यांचे गुरू. अभिनयाच्या संधीच्या शोधार्थ ते लाहोरला गेले. तिथे त्यांनी पंजाबी संगीत दिग्दर्शक बाबा चिस्ती यांचे कडे संगीत साधना सुरू केली. एके दिवशी चिस्ती यांनी संगीत दिलेल्या रचनेचा मुखडा खय्याम यांनी गायला तेव्हा चिस्तीं यांनी खुश होऊन त्यांना सहायक म्हणून स्वीकारलं. त्यांनी सहा महिने ते काम केलं. दुसऱ्या महायुद्धाच्या(WW II )वेळी खय्याम काही काळ लष्करातही दाखल झाले होते. खय्याम यांनी आपल्या सांगीतिक कारकिर्दीत सुमन कल्याणपूर, सुलक्षणा पंडित, येसुदास आदी गायकांकडून गीतं गाऊन घेतली. चित्रपट निर्मात्यांचा दब...