प्रासंगिक-कोरोना, टाळेबंदी आणि रेल्वे
कोरोना विषाणू चीन मध्ये उत्पन्न झाला आणि हळूहळू जगांतले बहुतेक सर्व देश त्याने व्यापले. प्रत्येक देश या विषाणू चा यथाशक्ती सामना करत आहे. या विषाणू मुळे होणाऱ्या कोविड-19 या रोगावर औषध अथवा लस उपलब्ध नसल्याने शारीरिक दुरी(physical distencing),शारीरिक स्वच्छता म्हणजेच वारंवार साबणाच्या पाण्याने हात धुणे, सॅनिटीझर चा वापर आणि टाळेबंदी सारख्या उपाय योजना अपरिहार्य आहेत. जगभरात दैनंदिन जीवनाला खीळ बसली आहे.
गुगल
या संदर्भात आपल्या देशाचा विचार करायचा झाल्यास भारत सरकार, राज्य सरकारं आणि प्रशासनान वेळीच घेतलेले निर्णय आणि त्याच्या अंमलबजावणी मुळे इथली परिस्थिती अद्याप नियंत्रणा बाहेर गेलेली नाही. कोविड-19 बाबतच्या एकूणच उपाययोजना देशातच नव्हे तर परदेशातही प्रशंसनीय ठरल्या आहेत आणि म्हणूनच जनतेचं सक्रिय सहकार्य नितांत गरजेचं आहे.
कोविड-19 या आजारा विरुद्धच्या लढाईत डॉक्टर, वैद्य,रुग्णसेवाकर्मी,सफाई कर्मचारी हे आघाडीचे आणि दर्शनी सैनिक आहेत मात्र याबरोबरच पडद्या मागून लढणारेही अनेक आहेत ज्यात जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादक, सेवापुरावठादार आणि सरकारी क्षेत्र यांचा समावेश होतो. कोरोनावर मात करण्याच्या प्रयत्नात भारतीय रेल्वे विशेष योगदान देत आहे.
अन्नधान्याची वाहतूक
सैन्य पोटावर चालते हे सत्य पूर्वापार पासून ज्ञात आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रत्येक देशवासियाच्या घरातली चूल पेटती राहणे आवश्यक आहे. यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात अन्नधान्याचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी रेल्वे प्रयत्नशील आहे. २२ एप्रिल २०२० रोजी रेल्वेने ११२ रॅक्सच्या मार्फत सुमारे ३ लाख टन अन्नधान्याची विक्रमी वाहतूक केली. त्याआधी ९ एप्रिलला तसेच १४ व १८ एप्रिल रोजीही सुमारे अडीच लाख टन अन्नधान्याची वाहतूक केली होती. एप्रिल महिन्याच्या पहिल्या २२ दिवसात भारतीय रेल्वेने यंदा आपत्कालीन परिस्थितीत, याच कालावधीत गतवर्षीच्या १.८२ दशलक्ष टनांच्या तुलनेत ४.५८ दशलश टन अन्नधान्याची वाहतूक केली.
३ मे २०२० पर्यंत वाढवलेल्या टाळेबंदीच्या काळात देशाच्या अतिदुर्गम भागातही अन्न व औषध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी अखंडित ठेवण्यासाठी रेल्वेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
मागणी नोंदवणाऱ्या जिल्ह्या प्रशासनाला विभिन्न रेल्वे स्वयंपाक घरातून दररोज 2.6 लाख शिजवलेलं जेवण पुरवण्याची तयारी रेल्वेने दर्शवली आहे. याबाबत देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. हे जेवण नाममात्र 15 रुपये दरात उपलब्ध असेल. या देयकाची पूर्तता राज्य सरकारकडून पुढील टप्प्यात करण्यात येईल.
पीपीई/कव्हरऑल उत्पादन
कोविड-19 रुग्णांवर उपचार करताना संक्रमणाचा धोका असलेल्या वैद्यकीय आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेच्या उत्पादन केंद्र, विभागीय कार्यशाळा आणि क्षेत्रीय विभागांनी वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई)/कव्हरऑल्स तयार करण्यास सुरवात केली आहे. एप्रिल २०२० मध्ये तीस हजाराहून अधिक तर मे महिन्यात एक लाख पीपीई किट्स ची निर्मिती करण्याची रेल्वेची योजना आहे.
अन्य उपक्रम
रेल्वे तसेच निर्यातीला प्रोत्साहन मिळून अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याच्या अपेक्षेनी २४ मार्च ते ३० एप्रिल २०२० पर्यंत रिक्त कंटेनर आणि रिक्त वॅगनच्या वाहतुकीसाठी कोणतेही विलंब शुल्क आकारले जाणार नाही.
अन्नधान्य, शेतमाल इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक मालवाहू डब्यातून करण्यासाठी रेल्वेच्या किमान मालवाहू डब्यांची संख्या 57 वरून 42 करण्यात आली आहे
उद्योगांना प्रोत्साहित करण्यासाठी मिनी रेक, टू पॉइंट रेक इत्यादी अंतराशी संबंधित अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.
या बरोबरच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माल वाहतुकीत सवलतींसह अन्य निर्णय भारतीय रेल्वेने घेतले आहेत.
संदर्भ: पी आई बीगुगल
नितीन सप्रे
Very true Nitin. Railways have done a splendid job
उत्तर द्याहटवा