प्रासंगिक - आयुष्यावर बोलू काही

आयुष्यावर बोलू काही



गेले काही दिवस सर्वत्र कोरोना व्हायरस आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या CO(कोरोना), VI(Virus), D(Disease) आणि 2019 साली आला म्हणून 19 अश्या कोविड-19 या आजाराची, त्यावर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची आणि अनुषंगिक चर्चा  सर्वत्र सुरू आहे. त्यातून या करोना विषाणूचा उच्छाद एखादे गाव, शहर किंवा देशा पुरताच मर्यादित नसून भूतलावरच्या बहुतांश भागाला त्याने ग्रासल आहे. हे विश्वाची माझे घरं ही संतोक्ती पृथ्वीवरच्या सर्वात उत्क्रांत समजल्या जाणाऱ्या मानव जातीला जरी अजूनही पूर्णपणे अंगीकारता आली नसली तरी कोरोना सारख्या अतिसूक्ष्म विषाणूने दुर्दैवाने ग्रहण केली आहे. या विषाणू विरोधात मानवाची धैर्यशील पणे लढाई सुरू असली तरी त्याची सर्वार्थाने ( जीव, वित्त, अर्थव्यवस्था आणि मानसिक अवस्था) अमर्याद किंमत चुकवावी लागते आहे. जगभरातली आकडेवारी आणि परिस्थिती बघितली तर दोन्ही महायुद्धांनी केलेल्या संहारापेक्षा अथवा भीषण आतंकवादी हल्ल्यापेक्षाही या महामारीची दाहकता निश्चितच जास्त आहे.
विशेष बाब म्हणजे या विषाणूने पृथ्वीवर प्रगत-अप्रगत, श्रीमंत-गरीब, सामर्थ्यवान-असमर्थ्यावान, पुरोगामी-प्रतिगामी असा कुठलाच भेदभाव न करता सर्वानाच आपल्या कराल विळख्यात ओढले आहे. एकप्रकारे संपूर्ण विश्वच एका अभूतपूर्व संकटाला सामोरं जात आहे.

अखिल जगाची या आधी अशी कुलूप बंद(लॉकडाऊन) अवस्था झाल्याचे माझ्यातरी आठवणीत नाही. अशा परिस्थितीत, अन्यथा अत्यंत हिरीरीने अथवा प्राणपणाने जपलेले, जोपासलेले सरहद्द वाद, सामर्थ्य वाद, वंश वाद , धर्म वाद,भाषा वाद,  यांचा निरार्थकपणा सिद्ध होऊन, एकसंधपणे लढा देण्याची मानसिकता बाळगणे अपरिहार्य ठरते. अश्या प्रसंगी एकमेकांवर कुरघोडी करणे, स्वार्थ जोपासणे, फायदा- तोट्याचा विचार करणे या सारख्या हिणकस गोष्टी टाळून प्रत्येकाने यथाशक्ती सर्वोत्तम देऊ केले तरच संकट निवळण्याची शक्यता बळावते.
देशापुरता विचार कराचा झाल्यास सध्याच्या परिस्थितीत तज्ज्ञांकडून, प्रशासनाकडून, कार्यकारी सत्ते कडून दिल्याजणाऱ्या सूचना काटेकोरपणे पाळून, आधीच तणावाशी सामना करणाऱ्या व्यवस्थेवर आपल्याकडून अधिकच ताण पडणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतलीच पाहिजे. अश्या प्रसंगी अधिकारी व्यक्तीच्या प्रत्यक मताशी, जर त्यामुळे मुख्य उद्देश गाठण्यात अडथळा येत नसेल तर, मतभेद व्यक्त न करण्याचा विवेक दाखवून आपण लक्ष्य सिद्धी साठी प्रयत्न करत राहणे अधिक उपयोगी ठरू शकते. एकमेकांवर कुरघोडी करण्यात किंवा आरोप करण्यात शक्ती क्षय न करता आपल्या सर्वशक्तीने, बुद्धीने कोरोना विजयाचा लक्ष्य भेद  करण्याचा प्रयत्नच मानवजातीसाठी तारणहार ठरू शकेल. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. भारतातल्या समान्यजनांच म्हणाल तर पहिली कुलुपबंदी यथाशक्ती पाळली मात्र ती अधिक निष्ठेने, संकल्पपूर्वक पाळली जाती तर कदाचित कोरोनाचा प्रसाराला आळा घालण्याच्या प्रयत्नांना जास्त बळकटी प्राप्त झाली असती. दुसऱ्या कुलुपबंदीचे आपण अधिक काटेकोरपणे पालन करीत कोरोना विरोधी लढ्यात आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे कदाचित येणारा काळ 'survival of the fitest' या न्यायाने दृढ निश्चयी,मनोविजयी अशांचाच असेल.
गेल्या तीन-चार दशकात भौतिक वाद अतिशय बोकाळल्याचे दिसून येते. भौतिक सुखांची प्राप्तीच यशस्वी जीवनाचा किंबहुना जीवन जगण्याचा मापदंड ठरवली गेली. आपल्या जीवनशैलीचे वायुगातीने पाश्चातीकरण होऊ लागले इतके की या शर्यतीत,ज्याच्यासाठी या भौतिक सुखसोई मिळवायच्या त्या जगण्याचाच श्वास कोंडू लागला. या शर्यतीत धावतांना सामाजिक, कौटुंबिक इतकेच कशाला स्वतः साठी वेळ द्यायला सुद्धा आपल्याकडे वेळ राहिला नाही. एकत्रित कुटुंबाकडून चौकोनी आणि आता तर दुकोनी कुटुंब असा आपला प्रवास सुरु आहे. बरं या सर्वामुळे तरी आपण समाधानी झालो का? तर उत्तर नाही असच येत. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात कुटुंबाला क्वालिटी टाइम देता येत नाही अशी तक्रार असलेल्या बहुतेकांना कोरोनाच्या  लॉकडाउन मुळे एकप्रकारे छान संधीच मिळाली आहे. पण वस्तुस्थिती बघितली तर सरसकट तसं चित्र दिसत नाही. आपल्याच प्रियजनांसमावेत वेळ घालवायला मिळाला असला तरी अनेक जण कंटाळलेत, कौटुंबिक हिंसेच्या बातम्या येत आहेत. असं का होत आहे?...सतत काहीतरी मिळवण्याच्या मागे लागलेल्या माणसाचं माणूसपण च तर हरवलं नाही ना?
आज हे सगळं इथे मांडण्याचे कारण म्हणजे निरर्थक धावपळीत सहभागी झालेले,ओढल्या गेलेल्या आशा सर्वानाच घरबंदीमुळे विचार करण्याची एक संधी प्राप्त झाली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. निसर्गाबरोबर आपणही आपलं आयुष्य फॉरमॅट करून घेऊया का?

टिप्पण्या

  1. सर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपण अतिशय सूक्ष्म, चिकित्सकपणे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं.आत्मचिंतन करण्यास प्रेरित करणारं लिखाण.
    बहोत बढिया,सर
    अभिनंदन

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अगदी नेमक्या शब्दात, सर्वांच्या मनातल तंतोतंत लिहिलय. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन कोणी पोहायचे यावर विचार मंथन करण्यास लाकडाऊन ही मिळालेली संधी आहे. प्रवाह विरुध्दचं जायला हवं का? तर नाही, अजुन तरी तशी वेळ आली नाही

      हटवा
    2. Extremely relevant. Simple and lucid thoughts expressed in effective way. Sarvana samuel ani patel ase. Well written

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक