स्मृतीबनातून प्रासंगिक - साssथी रे....
साssथी रे…
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतावर आधारित, काळजात कायम स्वरुपी घर करून राहतील अशा अनेक अजरामर शब्द - संगीत रचना, हिंदी चित्रपट सृष्टीने रसिकांना बहाल केल्या आहेत. शब्द, सुर, ताल यांचा सुंदरसा गोफ विणणाऱ्या या रचनांनी, जरी एखाद्या चित्रपटासाठी जन्म घेतला असला, तरी पुढे त्या स्वयंभू होऊन गेल्या. विनाशी देहातील अविनाशी आत्माच जणू. चित्रपट लक्षात राहो अथवा न राहो ही गीतं वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या ऐकली जातात, आळवली जातात, स्मरली जातात आणि चिरंजीवी होतात. अनेक नव्या कलाकारांना ती अविष्कारित करण्यासाठी खुणावत राहतात.
साथी रे भूल ना जाना मेरा प्यार(click to listen)
साथी रे भूल ना जाना
मेरा प्यार
मेरी वफ़ा का ऐ मेरे
हमदम कर लेना ऐतबार
दूर कभी कर दे जो मजबूरी
वो दूरी तो होगी नज़र की
दूरी
तेरी दुवाएं गर साथ रही,
आयेगी फिर से बहार
काश कभी ये रैना ना बीते
प्रीत का ये पैमाना कभी
ना रिते
डर है कही आनेवाली सहर,
ले ले ना दिल का करार….
संगीताचं भाव माधुर्य, मग भाषा कोणतीही का असेना, रसिक मनाला स्पर्शून जाईल अशा रचना रचण्यात रवींद्र जैन यांचा हातखंडा. जन्मापासूनच दृष्टीने दगा फटका झालेल्या या सूरदासाला सृष्टीनं स्वरांची दिव्य दृष्टी मात्र प्रदान केली . कोतवालच्या नायिकेच्या मनातील अत्यंत हळुवार भावना व्यक्त करणारे शब्द चालीत गुंफतांना ' दादू ' (या नावानेच ते चित्रपटसृष्टीत ओळखले जायचे) यांनी शांत, गंभीर आणि मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी हुरहूर निर्माण करणाऱ्या राग मारव्याचा साज चढवला आहे. मुखडा आणि दोन अंतरे असलेलं हे गीत स्वरमाधुर्याने ओतप्रोत आहे. शास्त्रीय संगीतावर आधारलेली, कदाचित सर्वात कठीण रचनांपैकी ही एक आहे. अवघड रचना आपल्या गळ्यातून अविष्कारीत असतांनाच तरल भावना अलवार पणे पोहचवण्याची तारेवरची कसरत करतांना आशाबाईंनी आपलं सर्व कौशल्य पणाला लावलं आहे. भावपूर्ण शब्द, काळीज काबीज करणारी चाल आणि समर्पित गायन असा त्रिवेणी संगम
या कलाकृतीतून अनुभवता येतो.
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
या कलाकृतीतून अनुभवता येतो.
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
Khup sunder . I liked it
उत्तर द्याहटवाकाय लिहू? आशा भोसले हा माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे. तुम्ही अप्रतिम लिहिलं आहे. संगीतकार, गीतकार रवींद्र जैन आणि आशाताईना सलाम
हटवाSuperb. Very informative
उत्तर द्याहटवाExcellent!!
उत्तर द्याहटवाफार छान!
उत्तर द्याहटवाExcellent..!!
उत्तर द्याहटवाThanks 😊
हटवानितीन, खूप छान, keep it up
उत्तर द्याहटवाThanks 😊
हटवाi had heard 1 story. ravindra jain was super excited to record this song. so he called Ashaji and said i have composed a song and we need to rehearse the song before we record it but Ashaji was very busy so couldnt give time for rehearsal. ravindraji was very upset. hence on the day of the recording he sang the song and said now u sing. Ashaji accepted the challenge and sang so beautifully that Ravindraji complemented her saying you have sung way better than my composition.
उत्तर द्याहटवाgreat composer and great singer combo!!!!!
Yes..even I heard something similar to this..Thanks.
हटवाएका सुंदर गाण्याला दिलेली उत्स्फूर्त दाद! ... नेहमीप्रमाणे मस्तच!!
उत्तर द्याहटवानेहमी प्रमाणे एकदम छान
उत्तर द्याहटवासर्वांगसुंदर लेख.
उत्तर द्याहटवावय होत जातं तस तसं आपण काय मिस केलं हे लक्षात येतं. तसंच आता आपल्याला नवं छान अनुभवायला आणि शिकायला मिळतं आहे हेही जाणवायला लागतं. सिनेमाचे संगीत माझ्या वेळचे १९६०-६५ मधले म्हणजे दिलीप, देव, आणि राज यांच्या सिनेमातील गाणी एवढ्या पुरतच कळत असे. शास्त्रोक्त संगीताच्या नावाने एकूण आनंदच होता. त्यामुळे रवींद्र जैन यांच्या संगीतातील बारकावे कुठून कळणार आणि इतक्या वर्षानंतर आठवणार? ते देखील कोतवाल साहेब अशा न पाहिलेल्या सिनेमातील गाण्याच्या संदर्भात?
उत्तर द्याहटवाआत्ता आत्ता पंच्याहत्तरी उलटल्यानंतर थोडं चांगलं कसदार संगीत ऐकायला सुरुवात केली. आणि आवडायला लागलं. नितीन सप्रे जी तुमचा ब्लॉग वाचल्यामुळे छान समजायला लागल. नाहीतर “विनाशी देहातील अविनाशी आत्मा” अशी शब्दरचना असणारी वाक्य न वाचता पुढे गेलो असतो. आज मात्र थोडं थबकून पुन्हा वाचलं, आणि रसग्रहण करावं असं ठरवलं. त्या निमित्ताने लिहायला बसलो. गाण्याची लिंक दिली असल्यामुळे पुन्हा पुन्हा ऐकणं आणि रसग्रहण करणे, तुमच्या मुद्द्यांची दखल घेणे हे शक्य झालं त्यामुळे आभार आणि शुभेच्छा. लिहीत राहा
किरण ठाकूर
खूप छान लिहिलं आहेस रे....
उत्तर द्याहटवापुन्हा प्रत्ययाचा आनंद काही वेगळाच असतो. खूप छान.
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेख . रविंद्र जैन फारच छान गाणी द्यायचे. त्यांचा काळ त्यांनी गाजवला होता
उत्तर द्याहटवा