प्रासंगिक - चाँदनी की ओट से मुस्कुरा गया कोई....

चाँदनी की ओट से मुस्कुरा गया कोई.... मुकेश चंद माथूर हे हिंदी चित्रपट सृष्टीला विसाव्या शतकाच्या चाळीशीत पडलेले एक सुरेल स्वप्नं होतं. स्वप्नं म्हटलं की त्याचा निद्रावस्थेशी संबंध आला. बंद डोळ्यांनी बघितलेला आविष्कार... पण मुकेश नावाचं हे स्वप्नं चोखंदळ रसिक उघड्या डोळ्यांनी आणि तृप्त कानांनी अक्षरशः जगले आहेत..जगत आहेत आणि जगत राहतील. चंदेरी दुनियेत प्रवेश करते वेळी मुकेश यांची गायक अभिनेता म्हणून स्थिरावण्याची महत्वाकांक्षा होती पण त्यांचा पहिलाच चित्रपट 'निर्दोष' रसिकांचं हृदय काबीज करण्यात असफल ठरला. आणखी काही प्रयत्नां नंतर मुकेश यांनी अभिनयाला अलविदा म्हणत पार्श्वगायना वरच लक्ष केंद्रित केलं. मुकेश यांच्यावर त्याकाळचे सुप्रसिद्ध गायक कुंदनलाल सैगल यांचा असीम प्रभाव होता. सैगल यांना ते आपला आदर्श मानीत. पार्श्वगायक म्हणून मुकेश यांनी पहली नजर (१९४५) या चित्रपटासाठी गायलेलं 'दिल जलता है तो जलने दे' हे पाहिलं गाणं तर, सैगल यांनीच गायलं आहे असा समज झाला होता. या गीता मुळे पहली नजर में ही मुकेश यांनी रसिकांच्या हृदयात घर केलं ते कायमच; अगदी 'चंचल शीतल निर्मल को...