प्रासंगिक-कोरोना काळातील निवडणुका

कोरोना काळातील निवडणुका लोकतांत्रिक राज्य पद्धतीत निवडणुकांना अनन्य साधारण महत्व आहे. निवडणूक म्हणजे एकप्रकारे लोकशाहीचा उत्सव. लोकशाहीतला एक मोठा सण. येत्या काही दिवसात जगातल्या दोन सर्वात मोठ्या लोकतांत्रिक राज्य व्यवस्था, वेगवेगळ्या स्तरावर च्या लोकमत चाचणीला सामोऱ्या जात आहेत. पहिली निवडणूक देशांतर्गत म्हणजेच बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी होते आहे तर सर्व जगाच लक्ष वेधून घेणारी दुसरी मोठी निवडणूक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदा साठी होते आहे. जगावर कोरोना संकट कोसळल्या नंतर या विपदेच्या छायेत होणाऱ्या या दोन महत्वाच्या निवडणुका आहेत. साहजिकच या अनुषंगाने सर्वसामान्य परिस्थितीत केल्या जाणाऱ्या प्रबंधनापेक्षा अधिक अशी व्यवस्था निवडणूक यंत्रणेला करावी लागली आहे. बिहार विधानसभा निवडणूक कोरोना संकटाच्या छायेत होत असलेली भारतातील ही सर्वात मोठी पहिलीच निवडणूक आहे. बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी एकूण तीन टप्प्यात ही घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २८ऑक्टोबर २०२० रोजी ७१ जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात ९४ जागांसाठी ३ नोव्हेंबर ला तर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात ७ नो...