स्मृतीबनातून-एकटा(पद्य)
एकटा
समजेल कुणी हृद, हे मना समजावले
कुणी नासमजते इथे, हेच समजून आले
भोवताली सतत असला, जरी गराडा माणसांचा
भोगीत आला प्रत्येकवेळी, शाप तो एकलेपणाचा
तरल भावनांना, कधी शब्द नाही लाभले
अंतरी रचनेचे कुणा, अर्थ नाही लागले
साहतो, होती मनावर, जे गुलाबी घाव न्यारे
क्षणी अवचित एका, वाहून गेले धैर्य सारे
लाख यत्न केले, सगळेच नाकाम झाले
लपविता मग आलेच नाही हरलेले नेत्र ओले
नितीन सप्रे
नवी दिल्ली
110423
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा