स्मृतीबनातून-प्रतिभा(पद्य)
प्रतिभा
तू गुलाब प्रेमला, सुरंग तो जीवनी
तू पुष्प मृदुला, मधुगंध ती मोहिनी
तू शितल चंद्रिका, आकाशी ती चांदणी
तू चपल तडीता, लखलख साऱ्या भुवनी
तू शब्द सरिता, तू भावगीत रागिणी
तू स्वर पौर्णिमा, स्वर राग आलापिनी
तू काव्य प्रेरणा, तू वाग विलासिनी
तू दिव्य प्रतिभा, तू गजगामिनी
नितीन सप्रे
नवी दिल्ली
130423
खूप छान आहे. तू दिव्य प्रतिभा, चाल गजगामीनी.।।।
उत्तर द्याहटवाअप्रतिम ...
उत्तर द्याहटवातू चपल तडिता लखलख सा-याभुवनी, सर्वोत्तम वाटल्या मला. अप्रतिम.
उत्तर द्याहटवाखूप छान!!
उत्तर द्याहटवा👍👍
अप्रतिम
उत्तर द्याहटवाकविता पुन्हा वाचताना पूर्वी पेक्षा वेगळं वाटतं. आनंद तू ,परमानंद तू।
उत्तर द्याहटवा