स्मृतीबनातून-सुहृद(पद्य)
मी विखुरलेले शब्द चालीत बांधण्याचे कुणा सहृदयी संगीतकाराने मनापासून मनावर घेतल्याचे जाणवले. मार्गदर्शनही केले. विचार छंदबद्ध काव्यात शब्दांकित करणे ही माझ्यासाठी सोपी गोष्ट नाही. पण प्रयत्न करायला काय हरकत? कसा वाटला जरूर कळवा.
सुहृद
कधी वाटते हात डोई फिरावा
सखा असा नित्य जवळी असावा
कधी हात त्याने हाती धरावा
कधी तोच हळुवार गाली फिरावा
कधी दाटले वाहिले नीर डोळा
प्रशिले मी मानुनी त्या गंगाजळा
कधी वाटते कधी भेटीस यावा
मृदुल शब्द हृदयी पेरून जावा
कधी मुक्त संचार त्याचा असावा
रंध्रात सर्वत्र पीत बहवा फुलावा
कधी मानसी तो असा आठवावा
काळीज हुरहूरे छेडीता जरा मारवा
कधी सूर माझा झालाच हळवा
खोचून पीस कान्हा होऊन यावा
नितीन सप्रे
नवी दिल्ली
170423
अप्रतिम
उत्तर द्याहटवाभावनांची तरलता शब्दातुन प्रतित होते,मस्तं
उत्तर द्याहटवानितीनजी,
उत्तर द्याहटवाबहावा असा फुलला की मनात अशा उर्मी उचंबळून येणं सहजच घडतं. माझ्या लेकीच्या दारात आत्ता असा बहावा फुललेला आहे . तुमची कविता नक्कीच गाणी बनून येईल असा मला विश्वास आहे
नितीनजी,
उत्तर द्याहटवातुमची कविता प्रत्येक वेळी नवीन रूप घेऊन प्रकट होताना दिसते आहे. बहावा जसा फुलतो तशाच मनातील भावना आपोआपच फुलू लागतात आणि ते शब्द कविता रूपाने बोलू लागतात. तुमची कविता गेयतेकडे नक्कीच जाणारी आहे .मला खात्री आहे लवकरच तुमच्या कवितांची गाणी होतील धन्यवाद.
वाहवा, बहावा! अप्रतिम
उत्तर द्याहटवाअभिप्राया बद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद
उत्तर द्याहटवामनीचे भाव उत्कटतेने व्यक्त केलेस मित्रा. शेवटची लाईन एक नंबर. ज्याचा सखा कृष्णा त्याला कशाची तृष्णा... संतूष्ट सतत् म योगी ...
उत्तर द्याहटवामाझ्या भावाला पाठवलीय कविता तो गाणं कंपनी करतो व गातो ही. बघूया.
उत्तर द्याहटवाकंपनी ऐवजी कंपोज वाचावे.
उत्तर द्याहटवा