स्मृतीबनातून-पहाट(पद्य)

आज पहाटेच जाग आली. चहा करून घेतला. सूर्योदयाची वेळ झाली होती. सहज बाहेर लक्ष गेलं तर गाभुळलेली पहाट नजरेत भरली. कसे कुणास ठाऊक पण शब्द रांगत आले आणि मी ते हातातल्या मोबाईलवर फक्त उतरवले...


पहाट



पसरला लालिमा, प्राचीच्या गालावरती

बिंब अहेव उठले तिच्या भाळावरती


प्रसवली निशा, प्रकाश क्षितिजावरती

जाहली सोनेरी लखलख भूमिवरती


छायेचे नर्तन रेखले धरणी वरती 

दव थेंब चमकती पानापानांवरती


चालले कूजन राव्यांचे हे सुरांवरती

सजीव मैफिल सजली अवनी वरती




नितीन सप्रे

नवी दिल्ली

180423




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून–सुधीर स्वरलालित्य

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती