स्मृतीबनातून-संमेलन(पद्य)
🌹 *सुप्रभात* 🌹
"मृत्यु" आणि "मोक्ष" यामध्ये काय फरक आहे?
माऊली म्हणतात.....
"श्वास पूर्ण झाले आहेत आणि "इच्छा" बाकी राहील्या आहेत, त्याला "मृत्यू" म्हणतात....
"श्वास" बाकी आहेत आणि सर्व "इच्छा" पूर्ण झाल्या आहेत, त्याला "मोक्ष" म्हणतात."
सकाळी एका मित्रानी व्हॉट्स ॲप वर पाठवलेला हा संदेश वाचल्यानंतर…
संमेलन
नुरावी एक ही इच्छा, संपण्यापूर्वी श्वास
सांगता या संमेलनाची, अशी व्हावी खास
कर्तव्य पूर्ण व्हावीत, मागणे हे तयास
सांगता या संमेलनाची, अशी व्हावी खास
व्हायचे जे होऊनी गेले, दुखवु नये कुणास
सांगता या संमेलनाची, अशी व्हावी खास
दृष्ट लागो न शेवटी, त्याने दिल्या जीवनास
सांगता या संमेलनाची, अशी व्हावी खास
भेटीची त्या राघवाच्या, लागून राहावी आस
सांगता या संमेलनाची, अशी व्हावी खास
सत्वर धावुनी यावा, घालता साद त्यास
सांगता या संमेलनाची, अशी व्हावी खास
कृतार्थता मानसी असावी, निर्वाणी तू रक्षावेस
सांगता या संमेलनाची, अशी व्हावी खास
नितीन सप्रे
नवी दिल्ली
190423
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा