स्मृतीबनातून - मागणे(पद्य)

जिवनयापन करत असताना माणसाच्या बऱ्याच आवश्यकता असतात. त्या परिभाषित होऊ शकतात आणि अत्यावश्यक त्या पूर्ण ही होऊ शकतात. इच्छांचं मात्र तसं नाही. एक पूर्ण होताच दुसरी जन्म घेते. 

"हज़ारों ख्वाहिशें ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले

बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले"

आणि म्हणूनच ईश्वर आपल्या आवश्यकतांच्याच यादीत असण  श्रेयस्कर...



मागणे


होईल मंद आता ज्योत नेत्री

दृष्टी पडावी तव शांत मूर्ती

मागणे इतुकेच आहे अखेरी 

एव्हढी कृपा कर गा मुरारी


होईल क्षीण आता आवाज कानी 

घेऊन टाळ नाचू तुझ्या किर्तनी 

मागणे इतुकेच आहे अखेरी

एव्हढी कृपा कर गा मुरारी


थकून गेली मलूल झाली वैखरी

राहावे सुरू नाम परी अंतरी

मागणे इतुकेच आहे अखेरी

एव्हढी कृपा कर गा मुरारी


संथ होईल आता श्वास नाकी

असावी तुझ्या दर्शनाची ओढ बाकी

मागणे इतुकेच आहे अखेरी

एव्हढी कृपा कर गा मुरारी


चैतन्य सोडून जाईल दुबळ्या शरीरी

कैवल्य माळ रुळूदे गळा सत्वरी

मागणे इतुकेच आहे अखेरी 

एव्हढी कृपा कर गा मुरारी




नितीन सप्रे

नवी दिल्ली

250423




टिप्पण्या

  1. खूप छान. मनापासून आवडली कविता.
    एवढेच "उपकार" कर गा मुरारी, अशी शेवटची ओळ असावी असं मला वाटलं.

    उत्तर द्याहटवा


  2. धन्यवाद संजय जी...सूचना योग्य वाटली. तिथे कृपा शब्द योजला आहे. उपकाराची भाषा परमेश्वराशी कशी करायची? सूचने मुळे योग्य बदल करता आला. धन्यवाद☺️🙏

    उत्तर द्याहटवा
  3. काय मागावे देवापाशी तर ह्या नितीनजींच्या पद्य रचनेतून जाणून घ्यावे।संपती नको देवा
    तुझा कृपा प्रसाद हवा देवा।अशी प्रेरणा देणारी कविता. The best.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक