स्मृतीबनातून-कर्ता पुरुष(पद्य)
सुप्रभात!
तसा मी फेसबुक वर सापडतो पण फार क्वचितच तिथे वावरतो. आज आकस्मिकपणें कुणी अंजना अग्रवाल यांनी पोस्ट केलेली एक हिंदी कविता तिथे दृष्टीस पडली. वाचली. ती भावली. तोच धागा पकडून मलाही काही सुचलं. तुमच्या अवलोकनार्थ आणि अभिप्रायार्थही…
(अंजना अग्रवाल यांची FB Post)
"पुरुष कठोर होता नहीं
बना दिया जाता हैं
अमुमन उसे प्रेम ही नही मिलता
मिलता हैं बस दायित्व
पुरुष को पुरा प्रेम करनेवाली
स्त्री जानती हैं कि
वह प्यार सरलता कोमलता
का कोष होता है
ऐसी स्त्री के आगोश मे
वह पिघलता हैं
रो तक देता है"
कर्ता पुरुष
दिसतं तसं नसतं
म्हणूनच जग फसतं
पुरुष कुठे कठोर?
तो तर हळवा चकोर
जीव कासावीस होणार
तरी 'वर्षा'साठीच थांबणार
दिसला जरी अधीर
असतो तितकाच सुधीर
जितका उथळ वाटणार
तितका सखोल असणार
कुटुंबासाठी सर्व कमवणार
रिक्तभावानं स्वतः जगणार
भोवतीच्या रंगात रंगणार
अलिप्त वृत्तीनं वावरणार
टीकाच पदरी पडणार
क्वचित प्रशंसापात्र होणार
संकटात सदैव आघाडीवर
सुखक्षणांत मात्र पिछाडीवर
सगळ्यांचं सगळं ऐकणार
योग्य तेच करणार
भावनिकता जरी जपणार
सहृदयालाच प्रचिती येणार
भवसंगरी थकणार भागणार
दिलासा शोधत राहणार
मिळाला कुठूनही जर
मनोमन हरखून जाणार
नितीन सप्रे
नवी दिल्ली
080423
मस्तं, पुरुषांना न्याय देणारी
उत्तर द्याहटवा