स्मृतीबनातून-नक्षत्र धारा(पद्य)

वैशाख झळा सोशीत रस्त्याच्या दुतर्फा हिरवा चुडा आणि लालीमा ल्यायलेल्या गुलमोहरानं आज सकाळच्या नाशिक प्रवासात चित्तवृत्ती फुलवल्या. कल्पनांना शब्दांची साथ मिळाली आणि…


नक्षत्र धारा


आठव तुझे फुलवती पारिजात

भेटीत अवघा पसरे सुवास


पद रवानी तुझ्या धन्य होती श्रुती

सुहास्य मधुमंद गुंगविते मती


नेत्र शरांनी सर्वत्र मृदुल घाव

अधरांवरी टिपूर पहाट दव 


करपाशी तुझ्या अनुभवतो मुक्तता

बोलातूनी वाहतो निर्झर गारवा


भेटीस येता अशी अधीर चंचला

बरसल्या त्या सजल नक्षत्र धारा


नितीन सप्रे

100523

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्मृतीबनातून - हृदयस्थ

स्मृतीबनातून –झूठे नहीं जूठे नैन

स्मृतीबनातून–भाळणे(पद्य)