स्मृतीबनातून-जत्रा(पद्य)

 जत्रा 


वासनांच्या सरोवरी आकंठ बुडालो मी असा 

बंदिस्त व्हावा भ्रमर कमलिनीच्या हृदयी जसा


मोहपाशी जत्रेत साऱ्या नकळत सुटला हात त्याचा 

भान आले, गेले कितीदा, बोचता पायात काचा


जिंकावयाचे आहे मला, हे भवाचे संगर

मागणे आहे तयाला, हात दे सत्वर


नितीन सप्रे, दिल्ली

nitinnsapre@gmail.com 

दिवाळी 2022



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक