स्मृतीबनातून-आयुष्याचे डाव(पद्य)
कधी कधी सकाळी जाग येते तेव्हाच मनात एखाद्या विचाराचा कोंब उगवलेला असतो. आज असच घडलं आणि चहाच आधण ते चहापान होऊन फिरायला बाहेर पडे पर्यंतच्या काळात त्यानं चांगलच बाळसं ही धरलं…
आयुष्याचे डाव
आता कुठे आयुष्य थोडे उमगायला लागले
एकेक त्याचे डाव सारे समजायला लागले.
आस धरता तू, कधी सुग्रास भोजनाची
योजल्यागत चाखशी तू, चव शिळ्या भाकरीची
सफल संपन्न जीवनाचे मांडे मनात मांडसी
विफल विपन्न जगण्याचे भोग भोगावे लागती
लाविसी सारे पणाला साधण्या जर पूर्णता
वाकुल्या तुज दाखवेल बेरकी ती अपूर्णता
नियतीला घाबरूनी काय जगणे सोडून द्यावे?
सुकर्माच्या दौलतीने डाव अवघे उधळून द्यावे
नितीन सप्रे
240523
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा