स्मृतीबनातून-हे मना...(पद्य)
शयनाधीन होण्यापूर्वी काल 'मना'वर लिहिलेल्या कविता, गाणी ऐकत होतो. शरीर झोपी गेलं मात्र ते शब्द, विचार मनात जागे राहिले. आपल्या मनात आदरस्थानी असलेल्या कित्येक थोरा मोठ्यांनी मनावर मनःपूर्वक लिहिलं आहे. मी ही माझं मन मोकळं केलं…
हे मना…
मनातल्या मनात मी मनासी विचारले
सांग ना कसे कुणी तुजला रिझवायचे?
कधी जिथे जीवनात धुंदी उपभोगितो
मात्र तू तिथेच शूळही भोगितो
कधी अकस्मात तू कुणावरी भाळतो
अन् कधी तसाच मोहभंग साहतो
कधी संकटातही निर्धार तू दावितो
कधी मात्र सुखेही हातपाय गाळीतो
कधी तू प्रकाश वेगाने धावतो
कधी काळ काळोख जागीच थिजतो
मना, सारे मनात तू ठेवितो
समीप राहुनी फार दूर राहतो
नितीन सप्रे
नवी दिल्ली
310523
मनामधील अव्यक्त भावना तुम्ही छान टिपल्या आहेत. आपले मन म्हणजे एक गुढ गोष्ट आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे मन चिंती ते वैरी न चिंती. काळजी लोभ मोह हे सर्व मनामध्ये वास करत असतात. खंबीर आणि निर्लस मनाची माणसे समाजात उठून दिसतात
उत्तर द्याहटवावा ,नितीनजी
उत्तर द्याहटवाखूप मनभावन कविता।
मनातलं अनेकवेळा मनात राहून जातं.
मनाशी सुद्धा बोलावं वाटू नये असं कधीतरी होऊन जातं।
साऱ्या भावना छान टिप
ल्यात