स्मृतीबनातून-प्रीती(पद्य)

 प्रीती

पाहिजे तू होतास तेव्हा

ऐकले हे शब्द जेव्हा

चांदण पाऊस आला

गात्री मुरून गेला


सोबतीस होती मधूरती 

गुंफुनी तिच्या हात हाती

मुक्त विचरलो पूनव राती

फुलून गेली गाभुळ प्रीती


लतिकेसम झुलत्या बटांनी

क्षेपूनी कटाक्ष नेत्रांनी

प्राशुनी प्रीत ओठांनी

साधला निर्विकल्प सर्वांगांनी


हे खरे? स्वप्न? की आभास?

उमजूच नये आपणास

पंचप्राण लावूनी पणास

साधणार ना मदनास




नितीन सप्रे,

नवी दिल्ली

nitinnsapre@gmail.com

120423





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक