स्मृतीबनातून-प्रश्न ?(पद्य)
यंदा काहीसा शितळ राहिलेला उन्हाळा गेले दोन दिवस आपल्या मुळपदी जातो आहे. उष्ण दुपारी मनात उमटलेले प्रश्न...
प्रश्न ?
(फोटो - नेहा सप्रे)
असे कसे कुणी हसायचे
साहतांना त्या वेदना
आवरायचे हुंदक्यांना अन् कसे
सर्वस्व अपुले गमवताना
केले जीवाचे रान होते
घर सान सजविताना
काय झाले ना कळे
भासतो आता एकलपणा
हीत ज्यांचे होते साधले
हात तेच झिडकारती
हे असेच घटले होते
वाल्यासंगे तेव्हा काही
जीवन सत्य असेच असते
गमते हे सर्वांना
का न चरण धरावे
हरीचे जीवन जगताना
नितीन सप्रे
नवी दिल्ली
(0906231650)
जीवन सत्य असेच असते
उत्तर द्याहटवाछोटिच कविता मोठा आशय. छान आहे👌
आशय पूर्ण कविता. ललित लेखनाप्रमाणे काव्य क्षेत्रातली तुमची मुसाफिर ही उत्तम आहे
उत्तर द्याहटवा