स्मृतीबनातून-सोहम(पद्य)
पहाटे उठतांना मनात सहजच आलेला विचार पहाट फेरी दरम्यान मनात घोळतच राहिला आणि नंतर त्यानं धारण केलेलं शब्दरूप आपणा सर्वांच्या अभिप्रायार्थ...
सोहम
आयुष्य म्हणजे गूढ कोडे वाटते
संपता संपता थोडे उमजू लागते
शैशवी मातापिता आदर्शवत भासती
तरुणाईच्या उंबऱ्यावर मागास ते वाटती
मैत्र, स्त्री, कलत्र सर्वस्व होऊ पाहते
हेही असती फुकाचे कालांतराने हे उमजते
इथे जो तो आपापला हे कळू लागते
'त्वमेव सर्वस्व' आता हळूहळू पटू लागते
भैरवीचे सूर जेव्हा आयुष्य आळवू पाहते
कोहमचे उत्तर सोहम तेव्हा मिळू लागते
नितीन सप्रे
नवी दिल्ली
(1406230830)
सुंदर,जीवनाचा प्रत्येक टप्पा कमी शब्दात बांधला!
उत्तर द्याहटवा