स्मृतीबनातून-चित्र(पद्य)

 चित्र

मनी असे जे सगळे बोलायाचे नसते

मर्म यास यशाचे मानले कधीच नव्हते


दाटला असता अंतरी अपुल्या कल्लोळ भावनांचा

शमवायचा मनातच मग भार का सोयाऱ्यांचा?


तट पार करावयास बसती नावेत सारे

डगमगता ती प्रवाही कोसण्यास सज्ज सारे


चित्र या जीवनाचे दिसते जर असेच

रंग त्यात भरण्यास झटावे का उगीच?


नितीन सप्रे

नवी दिल्ली

nitinnsapre@gmail.com 

(1806230820)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक