स्मृतीबनातून - खेळ(पद्य)
ऐन रंगात असलेला डाव तसाच सोडून देत दिवेलागणीची वेळ झाली की लहानपणी घरी परतावं लागत असे. यावरून मनात झालेली विचारांची गर्दी हळूहळू पांगती झाली. मात्र एक विचार शब्दात रुजला. पाहा तुम्हाला रूचतो का?...
खेळ
(फोटो - नेहा सप्रे)
चला तिन्ही सांज झाली
परतण्याची घरी वेळ झाली
आवरूनी घे व्यर्थ खेळाचा पसारा
दिवेलागणीची आता वेळ झाली
नित्य नवे खेळ शिकलास
खेळूनी खूप तू भागलास
समजून खेळ आपुल्या परीस
जिंकण्याचा डाव, केला प्रयास
उन्माद जीत, विषाद हार
दोन्हीतही नसे काहीच सार
चल माघारी आता फिर
अर्पून टाक देवास भार
जाणून घे एक सत्य
हार जीत असे असत्य
खेळूनी इथे नेटका खेळ
परतायचे घरी, होताच वेळ
नितीन सप्रे
नवी दिल्ली
(2206231745)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा